पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये; दीपक पांडेय यांचा 'तो' निर्णय रद्द

पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे अ‍ॅक्टीव्ह मोडमध्ये; दीपक पांडेय यांचा 'तो' निर्णय रद्द

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सबंध महाराष्ट्रात भोंग्यांवरून रणकंदन माजलेले असतानाच नाशिकच्या तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी भोंगे लावण्यासाठी परवानगी अनिवार्य केली होती. तसेच येत्या ३ मे पर्यंत अल्टीमेटमदेखील दिला होता. यानंतर ठिकठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांचे एक पथक जाऊन डेसिबल मोजत होते. त्यांच्या या निर्णयामुळे नाराजीचा सुरु दिसत होता....

दरम्यान, जिल्हास्तरावर या निर्णयाची आवश्यकता नसल्याचे स्पष्टीकरण आज नवनियुक्त पोलीस आयुक्त जयंत नाईकनवरे (Nashik police commissioner Deepak Pandey) यांनी दिले आहेत. राज्यस्तरावर याबाबत धोरणात्मक निर्णय होणार आहे. तसेच न्यायालयाने ठरवून दिलेल्या नियमावलीनुसार यापुढे नाशिकची वाटचाल असलायचे आयुक्त नाईकनवरे यांनी म्हटले आहे.

मनसेना अध्यक्ष राज ठाकरे यांनी भोंगे लावून हनुमान चालीसा लावा असे एका सभेतून सांगितले होते. यानंतर राजकीय वातावरण ढवळून निघाले. या वादाला धार्मिक रूप आल्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून भोन्ग्याचे राजकारण सुरु आहे. अशातच नाशिकचे तत्कालीन पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांनी भोंगे लावण्याबाबत आदेश काढले.

या आदेशाद्वारे शहरात भोंगे लावण्यासाठी परवानगी अनिवार्य करण्यात आली होती. तसेच भोन्ग्यांचे डेसिबल मोजण्यासाठी ठराविक पोलीस कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले होते. यामुळे आयुक्तांवर नाराजी व्यक्त केली जात होती. हा निर्णय रद्द झाल्यामुळे नाशिकच्या नवनियुक्त पोलीस आयुक्तांच्या निर्णयावर समाधान व्यक्त केले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com