नायलॉन मांजा विक्रेत्यांसह वापरणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल

पोलीस आयुक्त दीपक पांडे यांचा अध्यादेश जारी
नायलॉन मांजा विक्रेत्यांसह वापरणाऱ्यांवर होणार गुन्हा दाखल

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नायलॉन मांजा निर्मिती, विक्री व वापर यावर पोलिस आयुक्तांनी अध्यादेश काढत बंदी आणली आहे. यापुढे असे कोणी आढळल्यास त्यांच्यावर थेट गुन्हा दाखल करण्यात येऊन एक वर्षाच्या शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे....

मकर संक्रांति निमित्ताने शहरात पतंग उडवणाऱ्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर असते. अशातच नायलॉन मांजा व दोऱ्याला काचेची कटिंग करून काहीजण पतंग उडवत असतात. मात्र, यामुळे गेल्या काही दिवसांपूर्वीच नायलॉन मांजामुळे मान कापल्याने एका महिलेचा मृत्यू झाला होता.

तसेच बरेच दुचाकीस्वार देखील नायलॉन मांजाने जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या. याबरोबरच झाडांवर व खांबांवर हा मांजा अडकल्याने वन्य पक्षी तसेच प्राणीदेखील जखमी झाले होते.

तसेच बरेच प्राण्यांनी आपले प्राण देखील गमवल्याच्या घटना यापूर्वी घडल्याने पोलीस आयुक्त दीपक पांडे यांनी नायलॉन मांजा तसेच काचेची कोटिंग केलेला मांजा वापरणाऱ्यांवर देखील थेट गुन्हे दाखल करण्याचे परिपत्रक काढून आदेश दिले आहेत.

Related Stories

No stories found.