आता विनाहेल्मेट धारकांवर होणार कारवाई; पोलीस ॲक्टिव्ह मोडमध्ये

आता विनाहेल्मेट धारकांवर होणार कारवाई; पोलीस ॲक्टिव्ह मोडमध्ये

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल (No Helmet No Petrol) या मोहिमेनंतर हेल्मेटची शिस्त लागावी यासाठी हेल्मेट नसलेल्यांविरुद्ध आधी समुपदेशन आणि नंतर दंडात्मक कारवाई अशी प्रक्रिया राबविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Police Commissioner Deepak Pandey) यांनी दिली आहे...

त्यामुळे हेल्मेट नसताना पेट्रोल भरणे, पेट्रोल मिळाल्यानंतर पुन्हा हेल्मेट काढून ठेवणे, अशा क्लुप्त्या वापरणाऱ्या दुचाकी चालकांना चाप बसणार आहे.

शहरात १५ ऑगस्टपासून नो हेल्मेट, नो पेट्रोल मोहीम सुरू आहे. अपघातातील (Accidents) मृत्यूचे प्रमाण कमी करीत हेल्मेटचा वापर वाढविण्यासाठी पोलिस आयुक्तांनी केलेल्या निर्णयाला पाठिंबा मिळत असल्याने पोलिसांनी निर्णयाची अधिक कडक अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

एका बाजूला निर्णयाला प्रतिसाद मिळत असताना दुसरीकडे अनेक दुचाकीचालक अजूनदेखील वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरून हेल्मेट (Helmet) वापराकडे दुर्लक्ष करीत आहेत.

विशेषतः पेट्रोलपंपावर दुसऱ्याचे हेल्मेट वापरणे पेट्रोल घेण्यापुरतेच हेल्मेट वापरणे असे प्रकार घडतात या पार्श्वभूमीवर शहर पोलिसांनी अधिक कडक अंमलबजावणीसाठी फिरते पथक नेमण्याचा निर्णय घेतला आहे.

हेल्मेट जीवघेण्या अपघातापासून संरक्षणासाठी आहे. नियमांतील त्रुटीचा गैरफायदा घेण्याचे प्रमाण कमी करण्यासाठी पोलिस ठाणेनिहाय गस्ती पथकाची नियुक्ती करण्यात येणार आहे. हे गस्ती पथक पेट्रोलपंपावर लक्ष ठेवील. अचानक भेट देऊन गैरप्रकार टाळण्यात येतील. दुसरीकडे पोलिस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने रस्त्यावरदेखील तपासणी करण्यात येईल. दोन्ही प्रकारात नियम मोडताना आढळून येणाऱ्या दुचाकीस्वारांना थेट ताब्यात घेण्यात येईल. तेथून त्यांची रवानगी चिल्ड्रेन ट्रॅफिक पार्क येथे करण्यात येईल. येथे वाहनचालकांचे दीड ते दोन तास समुपदेशन करण्यात येईल. हेल्मेट वापराचे महत्त्व पटवून देण्यात येईल. तेथून या दुचाकीस्वारांना वाहतूक शाखेत दंड भरण्यासाठी पाठवण्यात येईल.

दीपक पांडेय, पोलीस आयुक्त, नाशिक शहर

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com