मिनी सब ज्युनियर स्पर्धेत नाशिकचे खेळाडू अव्वल

मिनी सब ज्युनियर स्पर्धेत नाशिकचे खेळाडू अव्वल

नाशिक | Nashik

१३ वी राज्यस्तरीय मिनी सब ज्युनियर स्पर्धा (13th State Level Mini Sub Junior Competition) १६ ते १८ मे रोजी हिंगोली (hingoli) जिल्ह्यातील वसमत (Wasmat) येथे नुकतीच पार पडली. या स्पर्धेत नाशिकच्या (nashik) खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता...

यामध्ये तनुजा कुलकर्णीला (Tanuja Kulkarni) १ सुवर्ण (Gold), १ रौप्य (Silver) २ कांस्य (Bronze) तनुश्री सोनवणे (Tanushree Sonawane) २ सुवर्ण (Gold) १ कांस्य (Bronze) वैष्णवी परदेशी (Vaishnavi Pardeshi) २ रौप्य (Silver) अंकुर आठरे (Ankur Athare) २ रौप्य (silver) २ कांस्य (bronze) साई पाटील (sai patil ) १ रौप्य (silver) १ कांस्य (bronze) अमन पाटील (Aman Patil) १ सुवर्ण (gold) २ कांस्य (bronze) अनुक्रमे पदकांची कमाई करत विजयवाडा (Vijayawada) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी (national competition) महाराष्ट्राच्या संघात आपली जागा निश्चित केली आहे.

त्याचप्रमाणे सांघिक प्रकारात इनिअन राऊंड मुलींमध्ये तनुजा कुलकर्णी (Tanuja Kulkarni) परी बत्तासे (Pari Battase) वेदश्री महाले (Vedashri Mahale) केतकी सातपुते (Ketki Satpute) या खेळाडूंनी कांस्य पदक (Bronze medal) मिळविले. तर इंडियन राऊंड मुलांमध्ये अंकुर आठरे, साई पाटील, कृष्णा सोनवणे, अथर्व वाघ या खेळाडूंनी रौप्य पदक (silver medal) मिळविले.

तसेच मिक्स टीम प्रकारात इंडियन या प्रकारात रौप्य (silver) तर रेकर्व्ह (Recurve) या प्रकारात सुवर्ण पदक पटकावले. याच ठिकाणी अंडर ९ स्पर्धा पार पडली. यामध्ये इंडियन राऊंड मुलांमध्ये अर्जुन कदम (arjun kadam) राम पाटील (ram patil) रुद्र परदेशी (rudra pardeshi) धनुष (dhanush) या खेळाडूंनी रौप्य पदक (silver medal) पटकावले.

या सर्व खेळाडूंना मंगला शिंदे, ज्ञानेश्वर थेटे, प्रतीक थेटे, अभिजीत थेटे, मोहन कसबे, नाशिक आर्चरी असोसीएशनचे (Nashik Archery Association) मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com