पीएफ सभासदांना सात लाखापर्यंत विमा योजना लागू

पीएफ सभासदांना सात लाखापर्यंत विमा योजना लागू

सातपूर | प्रतिनिधी

करोना महामारी काळात भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाद्वारे भविष्य निर्वाह निधी विभागाने कर्मचारी भविष्य निधी सलग्न विमा योजना असून या योजनेत सभासदांना लागूूू करण्यात आलेल्या विमा योजनेत वाढ करण्यात आली असून पूर्वीच्या सहा लाखांची मर्यादा वाढवून विमा रक्कम 7 लाखापर्यंत नेण्यात आली आहे. या योजनेंतर्गत 476 सभासदांच्या वारसांना 1 कोटी 60 लाख रुपयांचे अदा करण्यात आले आहेत. त्याबद्दल भविष्य निधी सदस्यांच्या कुटुंबियांनी समाधाान व्यक्त, केले आहे...

पीएफ सभासदांना सात लाखापर्यंत विमा योजना लागू
या लोकांना कोरोना लसीसाठी ९ महिने थांबावे लागणार ? का जाणून घ्या

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी व सुधारणा अधिनियम 1952 अंतर्गत कर्मचारी भविष्य निधी सतत विमा योजना 1976 नुसार विमा रक्कम 15 फेब्रुवारी 20 पासून 7 लाखापर्यंत वाढवण्यात आली आहे. या आधी ही रक्कम कमीतकमी अडीच ते 6 लाख एवढी होती.

भविष्य निधी सभासदाच्या पगारातील 12 टक्के एवढी रक्कम भविष्य निधी खात्यात जमा करण्यात येते. जमा झालेली रक्कम गरज भासल्यास किंवा सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचा-यांना व्याजासहित परत मिळते.

या व्यतिरिक्त पीएफ सभासदास पेन्शन व सभासदाचा सेवा कालावधीत मृत्यू झाल्यास भविष्य निधीतील जमा असलेल्या रक्कमेच्या सरासरी वर विमा रक्कम त्याच्या कुटुंबियांना वारसांना दिली जाते.

हा विमा एका लाईफ रिस्क पॉलिसीप्रमाणे असतो. कर्मचारी डिपॉझिट लिंक इन्शुअरन्स योजनेतर्गत हा विमा प्रत्येक पीएफ सभासदास अपोआप लागू असतो.

जो कर्मचारी भविष्य निधी सभासद आहे व ज्याचा मृत्यु सेवा कालावधी दरम्यान झाला असेल त्याच्या कुटुंबाला वारसा त्याच्या मृत्यु नंतर दिला जातो. परंतु यात कर्मचारी सर्विस मध्ये असणे गरजेचे आहे राजीनामा दिलेला अथवा कायमस्वरूपी निलंबित कर्मचारी या योजनेचे लाभ घेऊ शकत नाहीत.

पीएफ चे अडीच लाख दावे निकाली

भविष्य निर्वाह निधी विभागातर्फे एकूण 2 लाख 50 हजार 276 सभासदांना 1 अब्ज 05 कोटी 53 लाख रुपये अदा करण्यात आले असल्याचे नाशिक क्षेत्रिय भविष्य निधी आयुक्त एम. एम. अशरफ यांनी सांगितले. त्यात प्रामुख्याने भविष्य निधी (पीएफ) काढणाऱ्या 47 हजार 722 सभासदांनी 35 कोटी 4 लाख रुपये काढले. पीएफ खात्यातून उचल (ॲडवान्स) घेणाऱ्या 1 लाख 32 हजार 575 सभासदांद्वारे 40 कोटी 26 लाख रुपये विवीध कारणांमुळे काढण्यात आले. पेन्शन दाव्यासाठी च्या 5 हजार 896 सभासदांद्वारे 22 कोटी 98 लाख रुपये काढले.तर पेन्शन योजनच्या 10-C साठी 34 हजार 507 सभासदांद्वारे 5 कोटी 67 लाख रुपये काढले.

शासनाच्या लागू केलेल्या मृत्यू विमा योजनेत 476 सभासदांच्या वारसांना 1 कोटी 60 लाख रुपयांचे दावे निकाली काढण्यात आले आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com