नाशकात पेट्रोलचे तडाखेबंद नाबाद शतक; प्रतिलिटर १००.१९ रुपये, डिझेल नव्वदीपार

नाशकात पेट्रोलचे तडाखेबंद नाबाद शतक; प्रतिलिटर १००.१९ रुपये, डिझेल नव्वदीपार

नाशिक । प्रतिनिधी

अनेक दिवसांपासून नर्वस नाईंटीचा सामना करणार्‍या पेट्रोल दराने अखेर तडाखेबंद शतक ठोकले. मंगळवारी (दि.२५) नाशिक व सिन्नर तालुक्यातील पेट्रोल पंपांवर पेट्रोलची प्रति लिटर १००.१९ रुपये लिटरने विक्रि होत होती. तर डिझेलही प्रतिलिटर नव्वदिपार गेले आहे. मात्र या दरवाढीमुळे सर्वसामान्य मेटाकुटिस आले असून देशभरात महांगाईचा भडका उडण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे नाशिककरांवर हेच का 'अच्छे दिन' म्हणण्याची वेळ आली आहे.

पश्चिम बंगाल व पाच राज्यांच्या निवडणुकांमुळे इंधन दरवाढ टाळण्यात येत होती. मागील दीड महिन्यांपासून पेट्रोल प्रतिलिटर ९७ व डिझेल ८८ रुपये प्रतिलिटर होते. मात्र, पाच राज्याचा निकालानंतर इंधन दरवाढ करण्यात आली.

आंतराष्ट्रिय बाजारात कच्चे तेल प्रतिबॅलर ६८ ते ७० डाॅलर इतके आहे. तरी देखील पेट्रोल व डिझेलच्या दरात वाढ करण्यात आली आहे. पेट्रोल प्रतिलिटर शंभरीपार गेले आहे. तर डिझेल नव्वदिपार केली आहे.

पेट्रोलची व डिझेलची मूळ किंमत ही ३० ते ४० रुपये प्रतिलिटर इतकी आहे. पण केंद्र सरकारची एक्साईज ड्युटी, राज्य सरकारचा व्हॅट, सेस व डिलर्सचे कमीशन यामुळे भरमसाठ दराने इंधन भरावे लागत आहे.

करोना संकटामुळे अगोदरच अनेकांची पगार कपात झाली असताना वाढत्या दरामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला हा दरवाढिचा भुर्दंड सोसावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्याध्ये तीव्र रोष आहे.

डिझेल दरवाढिचा फटका माल वाहतुकिला बसणार आहे. त्यामुळे देशभरात अत्यावश्यक वस्तूंच्या किंमतीत वाढ होण्याची चिन्हे असून ऐन करोना संकटात महागाईचा बाॅम्ब फुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

सर्वसामान्यांबरोबरच पेट्रोल व डिझेल वेलफेअर असोसिएशनने या दरवाढिबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठी येणार्‍यांना हेच का 'अच्छे दिन' असा प्रश्न पडला होता.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com