मनपाचे 'मिशन विघ्नहर्ता'; ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन

मनपाचे 'मिशन विघ्नहर्ता'; ऑनलाईन स्पर्धांचे आयोजन

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

गणेशोत्सव २०२१ च्या (Ganeshotsav 2021) प्राश्वभूमीवर नियोजनासाठी नाशिक मनपा येथे अधिकाऱ्यांच्या उपस्थित बैठक झाली. बैठकीत मनपा आयुक्त कैलास जाधव (Nashik Municipal Commissioner Kailas Jadhav) यांनी गणेशोत्सव पर्यावरणपूरक व करोनाच्या (Corona) त्रिसूत्रीचे पालन करून साजरा होण्याच्या दृष्टीने नियोजन करण्यासाठी संबंधित विभागांना सुचना दिल्या....

गणेशोत्सव पर्यावरणपूरक होण्यासाठी शाडू मातीच्या मुर्तीची प्रतिष्ठापना करण्यासाठी जनजागृती व प्रबोधन करण्यात येणार आहे.

नागरिकांनी अमोनिअम बायकार्बोनेट पावडर पाण्यात टाकून त्यात गणेश मुर्तीचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांना अमोनिअम बायकार्बोनेट पावडर उपलब्ध करून देणे. मूर्ती विक्रीस्थळांवर पावडर वाटपासाठी स्टॉलची उभारणी करणे, मार्गदर्शक सूचनांचे फलक लावणे, मूर्तीच्या वजनाविषयी संबंधित विक्रेत्यांनी उल्लेख करण्याबाबत त्यांना सुचना देणे आदी कार्यवाही केली जाणार आहे.

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा होण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांनी सहभाग घ्यायला हवा. याकरीता शाडू मातीची मुर्ती तयार करणे, पर्यावरणपुरक आरास तयार करणे व मूर्तीचे पर्यावरणपूरक विसर्जन करणे, यासाठी ऑनलाईन स्पर्धा आयोजित करण्यात येणार आहे.

मूर्ती विसर्जनाकरीता ऑनलाईन स्लॉट बुकींग करणे हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येणार आहे. विसर्जनाकरीता ऑनलाईन स्लॉट बुकींग करणाऱ्या नागरिकांसाठी स्वतंत्र व्यवस्था असेल.

ऑनलाईन स्लॉट बुकींगमार्फत (Online slot booking) विसर्जन करणाऱ्या नागरिकांना क्युआर कोड जनरेट (QR code Generate ) झाल्यानंतर महानगरपालिकेमार्फत ई-सर्टिफिकेट (E-certificate) प्रदान करण्यात येणार आहे.

करोनाचे पालन करण्यासाठी फिरता कृत्रिम विसर्जन तलाव (Tank on Wheel) हा एक उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी ५० किंवा त्यापेक्षा जास्त सदनिका असलेल्या इमारती, सोसायट्या, कॉलनीच्या ठिकाणी हा उपक्रम राबविला जाईल. उपक्रमाकरिता प्रत्येक विभागासाठी एक याप्रमाणे सहा विभागाकरीता एकूण ६ फिरते कृत्रिम तलाव उपलब्ध करून दिले जातील.

विसर्जनाच्या अनुषंगाने नाशिक मनपा क्षेत्रात कृत्रिम तलावांसह विसर्जन ठिकाणे निश्चित करण्यात येऊन त्या ठिकाणी गणेश मूर्ती व निर्माल्य संकलनाकरिता आवश्यक व्यवस्था करण्यात येईल.

गणेशोत्सव आनंददायी होण्याच्या दृष्टीने नागरिक व सेवाभावी संस्थांचा व्यापक प्रमाणावर सहभाग होण्याच्या दृष्टीने सोशल मिडीयावर जास्त फॉलाअर्स असणारे नागरिक, संस्था तसेच मनपाने नियुक्त केलेले ब्रँड ॲम्बेसिडर (Brand Ambassador) यांची मदत घेतली जाईल.

नाशिक मनपातर्फे (Nashik NMC) करण्यात येणाऱ्या उपाययोजनांना नागरिकांनी प्रतिसाद देऊन महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्तांनी केले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com