खुशखबर! साहित्य संमेलनासाठी महापालिका देणार 'इतके' रुपये

खुशखबर! साहित्य संमेलनासाठी महापालिका देणार 'इतके' रुपये

नाशिक | प्रतिनिधी Nashik

सुमारे अठरा वर्षानंतर नाशिकमध्ये (Nashik) होणाऱ्या ९४ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी (94th Akhil Bharatiy Marathi sahitya sammelan) महापालिकेकडून पन्नास लाख रुपयांचा निधी मिळावा, अशी मागणी आयोजकांनी केली होती. तर महापालिका 25 लाख रुपये निधी देणार आहे. याबाबतचा प्रस्ताव शासनाकडे रवाना करण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव (NMC Commissioner Kailas Jadhav) यांनी दिली आहे....

२५ लाख रुपयांचा निधी देण्यासाठी शासनाची परवानगी मिळाल्यास हा निधी दिला जाणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. कार्यक्रम पत्रिका निश्चित झाली असून कार्यक्रम स्थळी जोरदार तयारी सुरू आहे.

संमेलनासाठी आयोजकांसह सामाजिक संस्था आणि लोकप्रतिनिधी सरसावले आहे. पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांनी जिल्ह्यातील आमदारांना निधी देण्यासाठी आवाहन केले होते. त्यानुसार, आत्तापर्यंत पाच आमदारांनी प्रत्येकी १० लाख तर एका आमदाराने पाच लाखांचा निधी दिला आहे.

महापालिकेने पन्नास लाख रुपयांचा निधी द्यावा, अशी मागणी आयोजकांनी महापालिकेकडे केले होती, त्यावर विचार करून महापालिकेने २५ लाख रुपयांचा निधी देण्याची तयारी दर्शवली असून तसा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठविला आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com