नाशिककरांना मिळणार स्पुटनिक व्ही लस?; महापालिका करणार ५ लाख डोसची मागणी

नाशिककरांना मिळणार स्पुटनिक व्ही लस?; महापालिका करणार ५ लाख डोसची मागणी

नाशिक | प्रतिनिधी

शहरातील नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात लसीकरणाची मागणी होत असल्यामुळे महापालिकेने ग्लोबल टेंडर काढले आहे. अद्याप आंतरराष्ट्रीय कंपनीकडून प्रतिसाद मिळाला नसला तरीदेखील येणाऱ्या काळात रशियन स्पुटनिक लसीचे पाच लाख डोस घेण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी सांगितले...

शहरासह जिल्ह्यात मर्यादित लस मिळत असल्यामुळे मागणीप्रमाणे पुरवठा होत नाहीये. ही समस्या सोडविण्यासाठी स्पुटनिक लसीसंदर्भात माहिती घेतली असता ही लस उपलब्ध होऊ शकते, अशा निर्णयापर्यंत आपण आलो असल्याचे जाधव यांनी सांगितले.

ते म्हणाले, लस खरेदी करण्यासंदर्भातील सूत्रांनी सांगतिले की, बृहन्मुंबई महापालिका लस खरेदी करणार असून, त्याबरोबरच नाशिक महापालिकेनेही मागणी केल्यास लस उपलब्ध होऊ शकेल. त्यामुळे आपण पाच लाख डोसची मागणी नोंदवणार आहोत.

अलीकडेच स्पुटनिक व्ही ही लस भारतात तयार केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. वर्षभरात जर दहा कोटी डोस उपलब्ध होणार असतील तर लवकरच नाशिक महापालिकेची मागणी विचारात घेतली जाणार आहे. स्पुटनिक व्ही या लशीचे दर इतर लसीपेक्षा अधिक आहेत.

जर महापालिकेने पाच लाख डोस मागवून पहिला डोस दिला तर दुसऱ्या पाच लाख डोससाठी पुन्हा मागणी नोंदवावी लागणार आहे. त्यामुळे महापालिकेवर येणार बोझा मोठा असेल. म्हणून महापालिका स्पुटनिक लस खरेदी करणार की नाही याबाबत साशंकताच आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com