परदेशी जाणाऱ्या पाचशे विद्यार्थ्यांचे लसीकरण

परदेशी जाणाऱ्या पाचशे विद्यार्थ्यांचे लसीकरण

नाशिक | प्रतिनिधी

शिक्षणासाठी परदेशी जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नाशिक महापालिकेच्या वतीने विशेष लसीकरण मोहीम हाती घेण्यात आली होती. यामध्ये सुमारे पाचशे विद्यार्थ्यांना लस देण्यात आली आहे...

नाशिकहून विदेशात शिक्षणासाठी जाऊ इच्छिणाऱ्या एकूण ४९७ विद्यार्थ्यांना आरोग्य विभाग तसेच जिल्हा आणि मनपा प्रशासनाच्या वतीने प्राधान्यक्रमाने लस दिली जात आहे.

मनपाच्या महाकवी कालिदास कलामंदिराशेजारील महात्मा फुले कलादालनात हे लसीकरण केले जात आहे.

अमेरिका, युरोप तसेच जगभरातील अन्य देशात शिक्षणासाठी जाणाऱ्यांना त्या देशात पोहोचण्यापूर्वीच लसीकरण करणे संबंधित देशांमधील प्रशासनाने बंधनकारक केले आहे.

विदेशातील नामवंत विद्यापीठांमध्ये शिक्षणासाठी जाणे हा त्या विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा असतो.

त्यात कोणताही अडथळा येऊ नये, तसेच कुणाही विद्यार्थ्याचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी हा लसीकरण होत आहे.

विदेशी जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांकडून मागणी होऊ लागल्याने हे लसीकरण करण्यात येत आहे. त्यात प्रारंभी केवळ १०० विद्यार्थी असतील, अशी अपेक्षा होती. मात्र, सोमवारपर्यंत एकूण ४९७ विद्यार्थ्यांचे लसीकरण झाले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com