जुन्याच ठेकेदारांना 2 वर्षे मुदतवाढ द्या

नव्या निविदा प्रक्रियेमुळे मनपाचे नुकसान
जुन्याच ठेकेदारांना 2 वर्षे मुदतवाढ द्या
नाशिक मनपा

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

नाशिक महापालिकेच्या (Nashik NMC) 354 कोटींच्या घंटागाडीच्या वादग्रस्त ठेक्यामुळे होणारी बदनामी महापालिका निवडणुकीत (NMC Election) डोईजड ठरण्याची शक्यता लक्षात घेत सत्तारूढ भाजप (BJP) बॅकफूटवर आली आहे...

या ठेक्यासाठी निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतानाच शिवसेना (Shivsena), काँग्रेससह (BJP) भाजपच्या स्थायी समितील नऊ सदस्यांनी जुन्याच ठेकेदारांना (Old contractors) दोन वर्षांची मुदतवाढ (Extension) देण्याची मागणी करणारे पत्र आयुक्तांना सादर केले आहे. नव्या निविदा प्रक्रियेमुळे महापालिकेचे आर्थिक नुकसान होणार असल्याचा दावा या पत्राद्वारे करण्यात आला आहे. विशेष म्हणजे स्थायी सभापती गणेश गिते (Ganesh Gite) यांनी यासाठी पुढाकार घेत वादावर पडदा टाकण्याची प्रयत्न केला आहे.

घंटागाडीचा 176 कोटींचा ठेका थेट 354 कोटींवर गेल्याने महापालिकेतील सत्तारूढ भाजपसह शिवसेना, कॉँग्रेस, राष्टलवादी, मनसेची अनोखी युती चर्चेत आली होती. कचरा संकलनात झालेली वाढ, घंटागाडीच्या संख्येत होणारी वाढ, इंधन दरवाढ तसेच कर्मचाजयांच्या किमान वेतनाचा वाढीव खर्च असे गृहीत धरून हा ठेका थेट 354 कोटीवर गेल्याचा दावा प्रशासनातर्फे करण्यात आला होता.

सत्तारूढ भाजपने त्यास होकार दिल्याने भाजपची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली होती. शिवसेनेने सुरूवातीला महासभेत नवीन ठेका देण्याऐवजी जुन्याच ठेकेदारांना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. शिवसेना विरोधी पक्षनेता अजय बोरस्ते व गटनेता विलास शिंदे यांनी महासभेत लेखी पत्राद्वारेही मागणी केली होती. मात्र भाजपाने बहुमताच्या जोरावर विरोध डावलून प्रस्ताव मंजूर केल्यानंतर निविदा प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला.

आता मात्र, महापालिका निवडणुकीच्या तोंडावर घंटागाडीचा विषय वादग्रस्त ठरत असल्याचे बघून स्थायीच्या नऊ सदस्यांनी घंटागाडीचा नवीन ठेका न काढता जुन्याच ठेकेदारांना मुदतवाढ देण्याची मागणी लेखी पत्राद्वारे केली आहे. त्याबरोबरच शिवसेनेनेदेखील मागील मागणीसाठी पु्न्हा जोर लावत नव्याने पत्र दिले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com