महापौरांकडून चौकशीचे आदेश; सीसीटीव्ही बघून होणार संबंधितांवर कारवाई

महापालिकेच्या इमारतीत रंगली ओली पार्टी; देशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्याने खळबळ
महापौरांकडून चौकशीचे आदेश; सीसीटीव्ही बघून होणार संबंधितांवर कारवाई

नाशिक | प्रतिनिधी

महापालिकेच्या इमारतीत ओली पार्टी रंगल्याची घटना उघडकीस आली आहे. इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर देशी दारूच्या बाटल्या, खाद्यपदार्थ, सिगरेटची थोटकं, गुटख्याच्या रिकाम्या पुड्या आढळल्याने खळबळ उडाली. दरम्यान, घडलेली घटना निंदनीय असून सीसीटीव्ही फुटेज बघून संबंधितांवर कारवाई केली जाईल अशी माहिती महापौर सतिश कुलकर्णी यांनी दिली आहे....

शहरात कडक लॉकडाऊन असतांना महापालिका मुख्यालयातील राजीव गांधी भवन इमारतीमध्ये तिसर्‍या मजल्यावर ओली पार्टी झाल्याचा प्रकार घडला होता. त्यावर आता स्वतः महापौर हतबल झाल्याचे दिसून आले. ते म्हणाले, असे कर्मचारी म्हणजे नाशिक महापालिकेचे दुर्दैव आहे.

महापालिकेत अनेक कर्मचारी करोना पॉझीटीव्ह आढळल्यानंतर महापालिका आयुक्तांनी अभ्यागतांना प्रवेशासाठी करोना चाचणी अहवाल असणे बंधनकारक केले होते. मात्र, कर्मचारीच चक्क महापालिका आवारात मद्यपान करीत असल्याचे आढळल्याने खळबळ उडाली आहे.

आज सकाळी अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांच्या पाहणीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज तपासून संबंधितांवर कारवाई करण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com