आज पुन्हा नाशकात लसीकरण बंद; नागरिकांचा हिरमोड

आज पुन्हा नाशकात लसीकरण बंद; नागरिकांचा हिरमोड

नाशिक | प्रतिनिधी

आज (दि २६) रोजी नाशिक महापालिका क्षेत्रातील संपूर्ण लसीकरण बंद राहणार असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली आहे...

दरम्यान, हा संदेश उशिराने नागरिकांपर्यंत पोहोचला तर अनेक नागरिकांनी सूचना न बघतच लसीकरण केंद्रावर गर्दी केल्यामुळे सकाळच्या सुमारास काहीशी गर्दी लसीकरण केंद्रांवर दिसून आली.

सोमवार (दि २४) रोजी २० हजार लसीचे डोस महापालिकेला प्राप्त झाले होते. यानंतर सोमवारी दहा हजार लस टोचण्यात आल्या. तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच काल (दि २५) रोजी उर्वरित ९ हजार लसीचे डोस टोचण्यात आले.

यानंतर महापालिकेला लसी प्राप्त न झाल्यामुळे आज लसीकरण बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com