सिटीलिंकची व्याप्ती वाढणार; 'या' मार्गांवर धावणार सीएनजी बसेस

सिटीलिंकची व्याप्ती वाढणार; 'या' मार्गांवर धावणार सीएनजी बसेस

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड अर्थात सिटीलिंकची (CITYLINC) व्याप्ती वाढणार आहे. सद्यस्थितीत ज्या मार्गांवर सीएनजी (CNG) आणि डीझेल बसेस (Diesel) धावत आहेत तिथे उदंड प्रतिसाद मिळत असून आणखीही अनेक भागातून नाशिककरांनी या बसेस सुरु करण्यासाठी प्रयत्न सुरु केलेले दिसून येत आहेत. आता नाशिक शहरातील कमी वर्दळीच्या पण महत्वाच्या असलेल्या मार्गांवर या बसेस धावणार असल्यामुळे नाशिककरांमध्ये आनंदाचे वातावरण आहे...

कालपासून (दि १४) या बसेस नव्या मार्गांवर धावताना दिसत आहेत. यामध्ये मार्ग क्रमांक २५३ मध्ये नाशिकरोड ते म्हाडा मार्गे (Nashikroad to Mhada) भाभानगर, सह्याद्री हॉस्पिटल, मुंबई नाका, प्रकाश पेट्रोल पामब, गोविंद नगर, सिटीसेंटर मॉल, उंटवाडी, त्रिमूर्ती चौक, कामटवाडा, डीजीपीनगर २ पुढे केवल पार्क अशा या बसेस धावतील. यामध्ये सकाळी पावणेनऊ वाजेपासून रात्री पावणेसात पर्यंत या बसेस दर तासाला धावणार आहेत.

दुसरा मार्ग म्हाडा ते नाशिकरोड (Mhada to Nashikroad) मार्गे केवलपार्क, डीजीपी २, त्रिमूर्ती चौक, उंटवाडी, सिटीसेंटर मॉल, गोविंद नगर, प्रकाश पेट्रोल मुंबईनाका, सह्याद्री हॉस्पिटल, भाभानगर असेल.

मार्ग क्रमांक २६५ वर नाशिकरोड ते आडगाव (Nashikroad to adgaon ) मार्गे द्वारका, कन्नमवार ब्रिज, पंचवटी कॉलेज, आडगाव नाका, जत्रा हॉटेल या मार्गावर बसेस धावतील. सकाळी ८ वाजल्यापासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यत या बसेस दर तासाला धावतील. दुपारनंतर यात अर्ध्या तासाचा फरक पडणार आहे.

तसेच परतीच्या मार्गी या बसेस आडगाव ते नाशिकरोड (Adgaon to Nashikroad) मार्गे जत्र हॉटेल, आडगाव नका, पंचवटी कॉलेज मार्गे कन्नमवार ब्रीज, द्वारका पर्यंत या बसेस धावतील. या बसेस सकाळी ७ वाजेपासून सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत या बसेस धावणार आहेत.

रिंगरोडला मात्र अद्याप बस नाहीच

नाशिक शहरातील महत्वाचे रिंगरोड असलेल्या रासबिहारी ते मेरी (Rasbihari School to Meri Office) आणि अमृतधाम ते तारवाला नगर (Amrutdham to Tarwala Nagar) मार्गावर अद्याप बसेस सुरु झालेल्या नाहीत. याठिकाणी मनपाकडून अद्याप सर्वेक्षणदेखील करण्यात आलेले नाही. दोन्ही मार्गांवर बसेस उपलब्द नसल्याने रिक्षावाल्यांची चांदी होत आहे. स्पेशल जावे लागेल सांगून रिक्षाचालक इथून प्रवाशांची लुट करताना दिसून येतात. त्यामुळे येथील नागरिक चक्री बससेवा सुरु करण्यात यावी अशी मागणी करू लागले आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com