
नाशिक | Nashik
आषाढी एकादशी (Ashadi Ekadashi) निमित्त पंढरपुरला (Pandharpur) जाणार्या दिंड्यामध्ये सहभागी झालेल्या माऊलीच्या हातुन देशी झाडांच्या वृक्षारोपनाचे कार्य घडावे या हेतुने नाशिक (Nashik) येथील श्री स्वामी समर्थ बहुउद्देशीय संस्थेनेे एक लाख आठ हजार बीज गोळे तयार केले आहेत....
पुणे (Pune) येथील संत ज्ञानेश्वर (Sant Dnyaneshwar) आणि संत तुकाराम महाराज (Sant Tukaram Maharaj) यांच्या पालखांच्या वारी मार्गावर वारकर्यांना त्याचे वाटप केले जात आहे. या उपक्रमात बीजगोळे (Seed Ball) तयार करायला नाशिकमधील महिलांचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.
संस्थेच्या वृक्षारोपनाच्या संकल्पपुर्तीसाठी पिठले महाराज संस्थान नाशिक, धरती फौंडेशन संगमनेर आणि नाशिक सातपूर येथील श्री. स्वामी समर्थ शक्तीपीठ या संस्थांचे सहकार्य लाभले. बिजगोळे तयार करण्यासाठी गांंडुळ खत, शेण आणि काळी माती यांच्या मिश्रणाचा वापर केला आहे.
देशी वृक्षांच्या बियांचेच बिजगोळे तयार करण्यात आले आहेत. वारकर्यांनी हे गोळे घरी न्यावेत आणि त्यांचे बांधावर किंवा गावातील मोकळ्या जागेत त्यांचे रोपन करावे असे आवाहन संस्थेने केले आहे.
दिंडी प्रमुखांच्या माध्यमातून बीजगोळे गावागावातील वारकर्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे संस्थेचे सचिव गुरुप्रसाद आव्हाड यांनी सांगितले.