...म्हणून जि.प. सेवकांचे काळ्या फिती लावून कामकाज

...म्हणून जि.प. सेवकांचे काळ्या फिती लावून कामकाज

नाशिक । प्रतिनिधी Nashik

जिल्हा परिषद सेवकांच्या (Nashik Zilla Parishad) विविध प्रलंबित प्रश्नांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवारी (दि.९) जिल्हा परिषद सेवकांनी काळ्या फिती लावून कामकाज करत दुपारच्या सुट्टीत निदर्शने केली...

सेवकांचे वेतन दरमहा एक तारखेला करण्यात यावे, सातव्या वेतन आयोगाच्या (7th pay commission) वेतन त्रुटी दूर कराव्यात, सन 2000 पासून सेवेत असलेल्या सेवकांना जुनी पेन्शन योजना लागू करावी,केंद्रीय सेवकांप्रमाणे महागाई भत्ता मिळावा अशा विविध मागण्या यावेळी आंदोलनकर्त्या सेवकांनी केल्या.

या आंदोलनामध्ये विजयकुमार हळदे,प्रशांत कवडे, शेखर शिंदे, दिनकर सांगळे,राजेश ठाकूर, प्रशांत केळकर, राजेंद्र बैरागी,चंद्रशेखर फसाळेयांच्यासह सेवक, सेविका सहभागी झाल्या होत्या.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com