Video : येवल्यात पुन्हा टोमॅटोचा चिखल; उभी झाडे शेतकऱ्याने कापली

Video : येवल्यात पुन्हा टोमॅटोचा चिखल; उभी झाडे शेतकऱ्याने कापली

येवला | प्रतिनिधी Yeola

वाघाळे (Waghale) येथील शेतकरी समाधान बळणाथ सोमासे या शेतकऱ्याने या वर्षी अर्धा एकर (२० गुंठे) टोमॅटो लावले होते. टोमॅटोला भाव नसल्यामुळे त्यामध्ये त्यांनी आज नांगर फिरवला आहे....

त्यांना २० गुंठे क्षेत्रासाठी लागवड आणि घरची मजुरी वगळता ६० ते ७० हजार रुपये खर्च आला होता. आताच कुठे टोमॅटो नुकतेच सुरू झाले आणि टोमॅटोचे भाव उतरले.

समाधान सोमासे यांनी बाजार भावाची परिस्थिती बघता आणि इथून पुढे टोमॅटो निघाल्यावर तोडण्याचा खर्च २० रुपये प्रति क्रेट तसेच मार्केटमध्ये नेण्यासाठीचा गाडी भाडे खर्च ३० रुपये प्रति क्रेट होणार आहे.

म्हणजेच आधीचे ६०-७० हजार झालेल्या खर्च व्यतिरिक्त टोमॅटो निघाल्यानंतर ५० रुपये प्रति क्रेट खर्च आहे. आजचे टोमॅटोचे बाजारभाव ४० ते ५० रुपये प्रति केरेट चालू आहे. त्यामुळे त्यातून खर्च तर निघतच नाहीये याउलट शेतकऱ्याला गाडी भाडे घरातून भरावे लागत आहे. आणि जर असेच चालू राहिले तर शेतकऱ्यांनी जगायचे कसे असा प्रश्न पडलेला आहे.

योग्य बाजारभाव न मिळाल्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चाललेला आहे आणि तरुण वर्ग शेतीकडे पाठ फिरवत आहे. समाधान सोमासे यांनी आज टोमॅटो पिकामध्ये नांगर फिरवला. या गोष्टी मुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com