विवाहितेच्या खूनाचे कारण उलगडले...

विवाहितेच्या खूनाचे कारण उलगडले...

पंचवटी | वार्ताहर

अनैतिक संबंधातून प्रियकर रिक्षाचालकाने एका विवाहित गर्भवती प्रियकर महिलेची निर्घृण हत्या केल्याचे तपासातून उघड झाले आहे. दाेन दिवसांपूर्वी मखमलाबादराेडकडे जाणाऱ्या पवार मळा येथील कच्चा रस्त्यालगतच्या नाल्याजवळ २० जानेवारी राेजी रात्री पीडित महिलेचा मृतदेह आढळून आला हाेता...

मृत महिलेचा शोध घेण्यासाठी म्हसरूळ पाेलीसांनी पोलीस आयुक्तालय, नाशिक शहरातील सर्व पो.स्टे ला बिनतारी संदेशाव्दारे कळविले हाेते. दरम्यान, पंचवटी पोलीस ठाणे येथे महिलेच्या वर्णनाशी मिळतीजुळती महिला मिसींग असल्याची तक्रार देण्यासाठी विनोद पंढरीनाथ आखाडे ( रा.मोरे मळा, पंचवटी, नाशिक) हे आले. त्यांनी मृत महिला ही पत्नी पूजा विनोद आखाडे, (२३, रा. मोरे मळा, पंचवटी नाशिक) व ती गर्भवती असल्याचे सांगितले.

त्यानंतर पाेलीसांनी तपासाचे अनुषंगाने सहायक पाेलीस निरीक्षक शिवाजी अहिरे, सदाशिव भडीकर, सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक मयूर पवार यांचे पथके तयार करून तपास सुरू करण्यात आला. घटनास्थळापासुनच जवळ सुरू असलेल्या अर्णन सृष्टी रो हाउस, या बांधकाम साईटवरील वाॅचमनकडे तपास केला असता त्यांने काळया रंगाचच्या रिक्षात एक संशयित व महिला जोरजोरात भांडण करत हाेते.

थोड्यावेळा नंतर ती रिक्षा जोरात तेथून निघुन गेली. त्यानुसार गुन्हे शोध पथकाने संशयिताच्या शाेधासाठी तपास सुरू केला असता मृत पूजा आखाडे हिच्या घरी जावुन तपास केला असता तिचा मुलगा साई विनोद आखाडे(४) याने आई पूजा ही सागर भास्कर बरोबर रिक्षाने जात असल्याचे सांगितले.

या माहितीवरून पाेलीसांनी सागरचे घर गाठले. परंतु, तो घरी मिळून आला नाही. रिक्षामालक मणीयार यांनी रिक्षाचालकाचे नाव आदेश उर्फ सागर दिलीप भास्कर (रा. मोरे मळा, पंचवटी) असे सांगितले. सागरबाबत त्याच्या मोबाईलचे तांत्रिक विश्लेषण करून तो कडोदा, जि सुरत, गुजरात येथे असल्याचे कळाले.

त्यानुसार पथक रवाना झाले. पंरतु सागर नाशिककडे आल्याचे समजले. दरम्यान, संशयित आदेश उर्फ सागर दिलीप भास्कर हा मखमलाबाद राेड बाद येथे आल्याची माहिती मिळताच त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्हा केल्याचे कबुल केले आहे. त्याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर यापूर्वी देखील गुन्हे दाखल आहेत.

ही कामगिरी पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, पोलीस उप आयुक्त अमोल तांबे, सहा. पोलीस आयुक्त प्रदीप जाधव यांचे मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ ढोकणे, सपोनि, सदाशिव भडीकर, सपोनि शिवाजी अहीरे, सपोनि सुधीर पाटील, पोउपनि मयूर पवार, हवालदार शेवरे, रहेरे, शिपाई चव्हाण, गुंबाडे व राठोड अशांनी केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com