नाशकात विकेंड लग्नसोहळे बंद; पुढील आदेश येईपर्यंत मॉलदेखील बंद

नाशकात विकेंड लग्नसोहळे बंद; पुढील आदेश येईपर्यंत मॉलदेखील बंद

सोमवार ते शुक्रवार शासनाच्या नियमाप्रमाणेच होणार लग्नसोहळे

नाशिक | प्रतिनिधी

राज्यात डेल्टा वेरीयंटचे (delta variant) रुग्ण वाढू लागल्यामुळे सरसकट सर्व जिल्ह्यांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले आहेत. (Nashik In third stage) यापार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सुरु असलेले लग्नसोहळे (Wedding) केवळ सोमवार ते शुक्रवार यादरम्यान होणार असून विकेंड (Weekend) म्हणजेच शनिवार आणि रविवारचे लग्नसोहळे बंद करण्यात आले आहेत. याबाबतचे आदेश आज जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी धाडले आहेत....

नाशकात विकेंड लग्नसोहळे बंद; पुढील आदेश येईपर्यंत मॉलदेखील बंद
Video : नाशिक तिसऱ्या टप्प्यात; सर्व दुकाने ४ वाजेपर्यंत राहणार सुरु, पाहा सविस्तर

नाशिक जिल्ह्यात सुरु असलेले विकेंड लॉकडाऊन (Weekend Lock down) कायम ठेवण्यात आले आहेत. मात्र, गेल्या वेळेच्या आदेशात शनिवार आणि रविवारी मोजक्या नातलगांच्या उपस्थितीत विवाह करण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, येत्या ५ जुलै २०२१ पासून केवळ ५० नातेवाईकांच्या उपस्थितीत सोमवार ते शुक्रवार दरम्यान लग्नसोहळे होणार आहेत. यामूळे ज्या नागरिकांनी पुढील महिन्यात सुट्टीच्या दिवशी लग्नसोहळे ठेवले आहेत त्यांना आता त्यांची तारीख बदलावी लगणार आहे.

जिल्हाधिकारी सुरज मांढरे (Collector Suraj Mandhare) म्हणाले की, आपण आधीपासूनच "to be at safer side" म्हणून जिल्हा तिसऱ्या टप्प्यातच ठेवलेला आहे. आता काल (दि २५) शासनाने निर्गमित केलेल्या सूचनाप्रमाणे कठोर अंमलबजावणी सुरू ठेवण्यात येणार आहे आणि जर पुन्हा वाढ दिसू लागली तर तस तसे निर्बंध अधिक कठोर करण्यात येतील. नागरिकांनी स्वयंशिस्त पाळावी ही अपेक्षा असल्याचे मांढरे म्हणाले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com