पित्याचा वारसा मुलाने चालवला; वावीच्या सरपंचपदी कर्पे बिनविरोध

गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी
पित्याचा वारसा मुलाने चालवला; वावीच्या सरपंचपदी कर्पे बिनविरोध

वावी | वार्ताहर Wavi

सिन्नर तालुक्यातील (Sinnar Taluka) वावी ग्रामपंचायतीच्या (Wavi Grampanchayat) सरपंचपदी प्रशांत रामनाथ कर्पे (Prashant Ramnath Karpe) यांची बिनविरोध निवड करण्यात आली....

कन्हैयालाल भुतडा (Kanaiyyalal Bhutada) यांनी सहकारी सदस्यांनी संधी मिळावी यासाठी सरपंचपदाचा राजीनामा दिल्याने महिन्यापासून सरपंचपद रिक्त होते. त्यामुळे उपसरपंच मीना नवनाथ काटे (Navnath Kate) यांच्याकडे प्रभारी सरपंचपदाची पदभार सोपविण्यात आला होता. सरपंच निवडीसाठी मंडळ अधिकारी आर. टी. पाटील (R T Patil) यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलविण्यात आली होती.

सरपंचपदासाठी निर्धारित वेळेत प्रशांत रामनाथ कर्पे (Prashant Karpe) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावर सूचक म्हणून ग्रामपंचायत सदस्य विजय भीमराव काटे यांची स्वाक्षरी होती. निर्धारित वेळेत प्रशांत कर्पे यांचा एकमेव उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने बिनविरोध निवडीची घोषणा मंडळ अधिकारी पाटील यांनी केली.

विशेष सभेस उपसरपंच मीना काटे, माजी सरपंच कन्हैयालाल भुतडा, विजय काटे, संदीप राजेभोसले, प्रेमलता जाजू, मीना मंडलिक, दीपाली खाटेकर, साधना घेगडमल, अश्विनी वेलजाळी, रामराव ताजणे, ग्रामविकास अधिकारी अलका खिराडकर, तलाठी के. यू. गायकवाड, कर्मचारी संदीप सरवार उपस्थित होते.

नवनिर्वाचित सरपंच प्रशांत कर्पे यांच्या ह. भ. प. पांडुरंगगिरी महाराज, भीमराव काटे, डॉ. कमलाकर कपोते यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करीत फटाक्यांची आतषबाजी केली. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करीत जल्लोष साजरा करण्यात आला.

यावेळी ह.भ. प.पांडुरंग गिरी महाराज, रामनाथ कर्पे, विजय सोमाणी,सर्जेराव वाजे, दिलीप वेलजाळी, कैलास जाजू, प्रदीप मंडलिक, विनायक घेगडमल, ज्ञानेश्वर खाटेकर, सचिन वेलजाळी, संदीप भोसले, चंद्रकांत खांबेकर,संजय भोसले,योगेश पाचपटील, दत्तात्रय नवले, बाळासाहेब गोराणे, आशीष माळवे, ओंकार मालपाणी, संजय देशमुख, मंदार केसकर,निलेश भुसे,लक्ष्मण नवले ?? यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.

पित्यानंतर मुलगा झाला सरपंच

वावी ग्रामपंचायतीत कर्पे कुटुंबाची विशेषत: राहिली आहे. माजी सरपंच रामनाथ कर्पे (Ramnath Karpe) सलग पाच पंचवार्षिक निवडणुकीत सदस्य म्हणून विजयी झाले होते. या कार्यकाळात त्यांनी सरपंच म्हणून गावचा कारभार सांभाळला होता. त्यानंतर त्यांचा मुलगा प्रशांत कर्पे सलग दोन पंचवार्षिक निवडणुकीत सदस्य म्हणून विजयी झाला आहे. आता प्रशांत कर्पे यांनाही सरपंचपद मिळाल्याने पित्यानंतर मुलास गावाचा कारभार सांभाळण्याची संधी मिळाली आहे. सलग ३५ वर्षापासून कर्पे कुटुंबाने गावच्या राजकारणावर पकड मिळविली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com