दहा तालुक्यांमध्ये ४८ टॅकरद्वारे पाणीपुरवठा

सर्वाधिक येवल्यात : पाच तालुके टॅकरमुक्त
दहा तालुक्यांमध्ये ४८ टॅकरद्वारे पाणीपुरवठा
Water Tanker

नाशिक । प्रतिनिधी

उन्हाचा झळा दिवसेंदिवस तीव्र होत असून ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवायला लागली आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यातील दहा तालुक्यातील ५८ गावे व ४५ वाड्यांना ४८ टॅकरद्वारे पाणी पुरवठा केला जात आहे. सर्वाधिक टॅकरची मागणी येवल्या तालुक्यात असून या ठिकाणी १८ टॅकरने पाणी पुरवठा केला जात आहे. दरम्यान जिल्ह्यातील पाच तालुके अद्याप टॅकरमुक्त आहेत....

गतवर्षी दमदार पाऊस झाल्याने धरणे अोव्हर फ्लो झाली होती. नदी व नाले तुडूंब भरुन वाहत होते. भूजल पातळीत वाढ झाल्याचे पहायला मिळाले. त्यामुळे मागील दोन वर्षाच्या तुलनेत यंदा फारशी पाणीबाणी जाणवली नाही.

यंदा देखील मे महिनाच्या प्रारंभी पर्यंत ग्रामीण जिल्ह्यात फारशी पाणीटंचाई जाणवली नाही. मात्र तापमानाचा पारा जसाजसा वाढत आहे तशी पाण्याची टंचाई ग्रामीण भागात जाणवू लागली आहे. नदी व नाले अटले असून विहिरिंनी तळ गाठला आहे.

त्यामुळे टॅकरच्या मागणीत वाढ होत आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात ४८ टॅकर सुरु आहेत. सन २०१८ मध्ये हे प्रमाण चारशे टॅकरच्या घरात होते. तर मागील वर्षी या कालावधीत टॅकरची संख्या पन्नासच्या आत होती.

दुष्काळी तालुके अशी अोळख असलेल्या येवला, बागलाण यांसह अतिवृष्टीसाठी अोळखले जाणारा पेठ तालुक्यातही पाणी टंचाइ जाणवू लागली आहे. आठ शासकिय व ४० खासगी टॅकरने गाव,वाडया व वस्तींवर पाणि पोहचवले जात असून ग्रामस्थांची तहान भागवली जात आहे.

अद्याप नाशिक, निफाड, सिन्नर, दिंडोरी व कळवण हे तालुके टॅकरमुक्त आहेत. मान्सून जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. मात्र मान्सूनला उशीर झाल्यास जिल्ह्यात टॅकरची हाफ सेंच्युरी पूर्ण होऊ शकते.

तालुकानिहाय टॅकर

बागलाण - ४

चांदवड - ६

देवळा - २

इगतपुरी - ३

मालेगाव - २

नांदगाव - १

पेठ - ८

सुरगाणा - १

त्र्यंबक - २

येवला - १८

विहिर अधिग्रहण

गावांसाठी - ३५

टॅकरसाठी - ११

टॅकर फेर्‍या - ११४

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com