शुक्रवारी पंचवटीतील 'या' भागांत पाणी नाही

शुक्रवारी पंचवटीतील 'या' भागांत पाणी नाही

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पंचवटी विभागातील म्हसरूळ परिसरात शुक्रवारी काही भागात पाणीपुरवठा महापालिकेकडून होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे...

अधिक माहिती अशी की, म्हसरुळ (Mhasrul) येथील एस्सार पंपाच्या पाठीमागील मागील बाजूच्या जलकुंभाजवळ पाणीपुरवठा करणारी वितरण वाहीनी जोडणीचे काम (cross connection) लवकरच हाती घेण्यात येणार आहे.

हे काम शुक्रवार (दि.03) रोजी पूर्ण करण्यात येईल. त्यामुळे येथील जलकुंभावरुन होणारा प्रभाग क्र.1 मधील दिंडोरी रोडच्या पुर्वेकडील भाग गजपंथ सोसायटी, रामचंद्रनगर, वडजे मळा, म्हाडा कॉलनी, कलानगर, प्रसादनगर, विजयनगर, पोकार कॉलनी, गायत्रीनगर, साईनगर, राजमाता म्ंगल कार्यालयापर्यंतचा दुपारचा पाणीपुरवठा होणार नसल्याची माहिती देण्यात आली आहे. तर शनिवार (दि.04) रोजीचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल अशी माहिती देण्यात आली आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com