पुढील आठवड्यापासून नाशकात पाणीकपात

पुढील आठवड्यापासून नाशकात पाणीकपात
पाणी

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांच्या पाणीपातळीत कमालीची घट होत आहे. त्यामुळे शहरात आठवड्यातून एक दिवस पाणीकपात करण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती महापालिका आयुक्त कैलास जाधव यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली. महिनाअखेर पावसाने अशीच दडी दिली तर दिवसाआड पाणीकपातीची अंमलबजावणी केली जाईल असेही जाधव म्हणाले....

गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकसह परिसरात पावसाने पाठ फिरवली आहे. जून महिन्यातही पावसाने दडी दिली. जुलैपासून पाऊस पुरवत होईल असे दिसत असतानाच अर्धा महिला लोटला तरीदेखील अद्याप नाशिक सह परिसरात पाऊस पडला नाही. त्यामुळे दिवसेंदिवस धरणांची पाण्याची पातळी कमी झाल्याचे दिसून आले आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा शिल्लक नाही. त्यामुळे पुढील आठवड्यातील गुरुवारपासून (दि २२) पाणीकपात केली जाणार आहे. धरणात ५० टक्के पाणीसाठा होईपर्यंत आठवड्यातून एक दिवस पाणीकपात केली जाईल असे आयुक्त जाधव म्हणाले.

दरम्यान, जुलै महिन्याच्या अखेरपर्यंत जर वरूणराजा नाशकात बरसलाच नाही तर ऑगस्ट महिन्यापासून एकदिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येईल असेही आयुक्त जाधव यांनी सांगितले. त्यामुळे नाशिककरांनी पाणी जपून वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com