वीर ईलेक्ट्रो प्रा. लि. कंपनीतील कामगार संपावर

वीर ईलेक्ट्रो प्रा. लि. कंपनीतील कामगार संपावर

इगतपुरी । प्रतिनिधी Igatpuri

तालुक्यातील गोंदे औद्योगिक वसाहतीतील वीर ईलेक्ट्रो प्रा. लि. (Veer Electo private Limited) कंपनीतील कामगारांना कामगार कायद्याच्या कोणत्याही सुविधा लागु न केल्याने कामगारांनी कालपासून (दि. २०) संपावर जाण्याचा निर्णय घेऊन आजपासुन बेमुदत संप पुकारला आहे...Nashik

या कंपनीत नाशिक वर्कस युनियन (Nashik Workers Union) असुन युनियनचे नाशिक जिल्हा सरचिटणीस संतोष काकडे (Santosh Kakde) यांनी या कंपनीतील कामगारांच्या वेतनवाढीच्या करारा संदर्भातील सर्वसाधारण मागण्यांचा मसुदा कंपनी व्यवस्थापनास मागील वर्षी २४ ऑगस्ट२०२० रोजी ओडी पोस्टाने सादर केला होता.

मात्र, सदर मसुद्यावर चर्चा होऊन वेतन वाढीचा करार होणेकामी आजपर्यंत कंपनी व्यवस्थापनाने वेतनवाढीच्या करारा संदर्भात चर्चेसाठी युनियनला बोलावले नाही. मागणी पत्रावर चर्चा होऊ न शकल्याने कामगारांमध्ये तीव्र असंतोष पसरला असल्याने त्वरीत चर्चा होऊन पगारवाढ झाली पाहिजे.

कामगार उपायुक्त कार्यालयात कंपनी व्यवस्थापन व युनियन यांच्यात चर्चा होऊन पीएफ, ईएसआयसी, स्पेशल अलाऊन्स देण्याचे मान्य केले होते. परंतु अद्यापही व्हीडीए लागु केला नसुन तो त्वरीत लागु करावा, युनियन कामगारांमध्ये भेदभाव करून कामाची जागा बदल करावा, काही कामगारांना कामावरून कमी केले आहे. त्या कामगारांना त्वरीत कामावर घ्यावे आदी मागण्यांसाठी आज पहिल्यापाळीपासुन कामगारांनी बेमुदत संप पुकारला आहे.

या प्रसंगी सीआयटुचे जिल्हा उपाध्यक्ष तुकाराम सोमजे, तालुकाध्यक्ष दत्ता राक्षे, किसानसभा तालुकाध्यक्ष चंद लाखे, सरपंच ज्ञानेश्वर उगले, उपसरपंच ज्ञानेश्वर तोकडे, सरचिटणीस विजय नाठे, गोदेंचे सरपंच शरद सोनवणे, ग्रामपंचायत सदस्य गोपाळ नाठे, निलेश नाठे, सुनिल नाठे, परशुराम नाठे, यांच्यासह इम्फिलुम इंडियाचे विठोबा कातोरे, भाऊसाहेब जाधव, अशोक कदम, शरद बोराडे, मनोज भोर, नितीन गवते यांच्यासह कामगार व महिला कामगार आदी उपस्थित होते.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com