मुंबईची चिंता मिटली; वैतरणा 'ओव्हरफ्लो'

मुंबईची चिंता मिटली; वैतरणा 'ओव्हरफ्लो'

घोटी|Ghoti

मुंबईला पाणीपुरवठा करणारे सर्वात महत्वाचे अप्पर वैतरणा धरण (Vaitarna Dam) 98.70 टक्के भरले आहे. ओव्हरफ्लो झाल्याने परिसरातील शेतकर्यानी समाधान व्यक्त केले तर मुंबईकरांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत अप्पर वैतरणा धरण एक महिन्याने उशिरा भरले आहे. आज तीन सांडव्याचे एक फुट गेट उचलत 1 हजार 865 क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला असुन कालव्याद्वारे 450 क्युसेक्सने विसर्ग करण्यात आला आहे. धरण भरल्याने मुंबईकरांसह वैतरणा परीसरातील नागरिक व शेतकऱ्यांची अखेर चिंता मिटली आहे....

गेल्या वर्षीच्या तुलनेत एक महिना उशिराने हे धरण भरले आहे. येत्या तीन ते चार दिवसांत सुरूवातीपासुनच धरण क्षेत्रात मुसळधार पावसासह संततधार सुरू असल्याने अप्पर वैतरणा धरण ओव्हरफ्लो झाले असून 98. 70 टक्के भरल्याने सांडव्याद्वारे 1865 क्युसेक्सने तर कालव्याद्वारे 450 क्युसेक्सने विसर्ग सुरू करण्यात आला.

दरम्यान, धरण क्षेत्रात गेल्या दोन दिवसांपासुन संततधार सुरू असुन धरणामध्ये पाण्याचे आवक सुरूच आहे. धरण क्षेत्रात पाण्याचे आवक वाढल्यास सांडव्याद्वारे आणखी विसर्ग वाढवण्यात येऊ शकतो असा अंदाज असुन त्या दृष्टीने वैतरणा पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी 1) निलेश वन्नेरे (Nilesh Vannare), शाखा अभियंता भुषण दळवी (Bhushan Dalavi) आदींसह कर्मचारी लक्ष ठेवुन असुन योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

अप्पर वैतरणा धरण परिसर पर्यटकांना नेहमीच आकर्षित करत असतो. मात्र, गतवर्षी कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पर्यटकांनी मोठ्या प्रमाणात परिसराकडे पाठ फिरवली असुन थोड्या फार प्रमाणात पर्यटक येत आहे. अप्पर वैतरणा धरण सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये असुन डोंगर दर्यांवरून कोसळणारे पाणी मोठ्या प्रमाणात असुन छोटे - मोठे अनेक धबधबे बघायला मिळतात. परिसरात धबधब्यांसह धुके व संपुर्ण परिसर हिरवामय झाल्याने या परिसराचे आकर्षन कायम असते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com