नाशकात होतंय वशिल्याचे लसीकरण

नाशकात होतंय वशिल्याचे लसीकरण

लोकप्रतिनिधीच्या कार्यालयातून मिळते टोकन; सामाजिक कार्यकर्त्यांचा आरोप

इंदिरानगर | वार्ताहर

वडाळागाव सावित्रीबाई फुले प्राथमिक आरोग्य केंद्रात लसीकरण्यासाठी राजकीय हस्तक्षेप वाढू लागले आहेत. नगरसेवक व त्यांचे नातेवाईक यांना लसीसाठी प्राधान्य दिले जात असल्याची घटना समोर आली आहे. चक्क लसीकरणासाठी देण्यात येणारे टोकण एका नगरसेवकाच्या कार्यालयात मार्फत मिळत असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते रमीज पठाण व जय कोतवाल यांनी केला आहे...

वडाळागाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर 45 वर्षाच्या पुढील नागरिकांसाठी दुसरा डोस देण्यासाठी लसीकरण सुरू आहे. मात्र, काही नगरसेवक आपले नातेवाईक कार्यकर्ते यांना बेकायदेशीरपणे लस देण्यासाठी डॉक्टर व तेथील कर्मचाऱ्यांवर दबाव आणत आहेत.

चक्क 45 वर्षाच्या खालील लाभार्थ्यांना देखील फ्रन्टलाइन वर्कर दाखवून लस देण्यात येत आहे. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना लसीसाठी तासनतास उभे राहून ही लस न मिळाल्याने परतावे लागत आहे.

केंद्रावर सुरू असलेला राजकीय हस्तक्षेपाला सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिक वैतागले आहेत.
लसीकरण करण्यासाठी येणाऱ्या नागरिकांन साठी मंडप उभारण्यात आलेला आहे. मात्र, त्याचा उपयोग येथील डॉक्टर आपली चार चाकी गाडी उभी करण्यासाठी करत असल्याचे दिसून आले.

लसीकरणाच्या ठिकाणी नगरसेवक व त्यांचे नातेवाईकांना टोकन दिले जात आहे. 45 वर्षाखालील नगरसेवक यांचे नातेवाईकांना फ्रंटलाईन वर्कर दाखवून लसीकरण केले जात आहे. त्याच्यात मात्र सर्वसामान्य ज्येष्ठ नागरिकांचे हाल होत आहे.

जय कोतवाल, सामाजिक कार्यकर्ता

सध्या ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरणासाठी प्राधान्य दिले जात आहे परंतु 45 वर्षाच्या खालील नागरिकांना फ्रन्टलाइन वर्कर दाखवून सर्रासपणे लसीकरण चालू आहे त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे लसीकरणसाठी देण्यात येणारे टोकण चक्क एका नगरसेवक यांच्या कार्यालयातून त्यांचे नातेवाईक व जवळचे कार्यकर्त्यांसाठी वितरित होत आहे याबाबत संबंधित आरोग्य कर्मचारी व डॉक्टरांवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी.

रमीज पठाण, सामाजिक कार्यकर्ता

आम्ही काही फ्रन्टलाइन वर्कर यांचे लसीकरण केले असून 45 वर्षाखालील नागरिकांचे लसीकरण आम्ही पूर्णतः बंद केलेले आहे.

डाँ अशोक गायकवाड, वडाळागाव सावित्रीबाई फुले प्राथमिक आरोग्य केंद्र

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com