नाशकात लसीकरण होणार सुरळीत; आज ५७ हजार लसी प्राप्त

नाशकात लसीकरण होणार सुरळीत; आज ५७ हजार लसी प्राप्त

नाशिक | प्रतिनिधी Nashik

जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून लसीकरणाचा (Covid 19 Vaccination) वेग चांगलाच वाढला होता. मात्र, गेल्या चार दिवसांपासून लसींच्या तुटवडयामुळे अचानक लसीकरण बंद (Vaccination Campaign stopped due to shortage of vaccine) झाले होते. आज जिल्ह्याला ५७ हजार लसीचे डोस प्राप्त झाले असून उद्यापासून मंदावलेली लसीकरण मोहीम पुन्हा एकदा पूर्ववत होणार आहे....

दररोज 10 ते 15 हजार नागरिकांना देण्यात येणारी लस गेल्या काही दिवसांत प्रतीदिवस 25 हजाराच्या पुढे नेण्यात आले होते. लसींचा तुटवडा निर्माण झाल्याने लसीकरणाचा वेग मंदावला होता. गेले काही दिवस केवळ शहरात एकाच केंद्रावर लसीकरण सुरू होते. (Only one vaccination center open in nashik)

तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर शासन एकीकडे लसीकरण मोहीम राबवून सर्वांचे लसीकरण करण्यासाठी प्रयत्न करत असताना दुसरीकडे लशी उपलब्ध होत नसल्याने नागरीकांनी संताप व्यक्त केला होता.

आज नाशिक जिल्ह्याला ५७ हजार लसी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये कोविशिल्ड (covishield vaccine) ४३ हजार डोस तर कोव्हक्सीन (covaxin vaccine) १४ हजार डोसेस प्राप्त झाले आहेत. तर मनपा क्षेत्रामध्ये यातील १० हजार ८० डोस उद्यापासून देण्यास सुरुवात होणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com