नाशिक | प्रतिनिधी

नंदुरबार जिल्ह्यातील आदिवासी पाड्यातील ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचा निकाल ४२ लाखांना गेल्याची घटना दाजी असताना नाशिक जिल्ह्यातील उमराणे गावाच्या ग्रामपंचायतीचा निकाल तब्बल दोन कोटी ५ लाखांना लावल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लिलावाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला असून सध्या चर्चेचा विषय ठरला आहे...

देवळा तालुक्यातील उमराणे हे पंचवीस हजार लोकसंख्येचे गाव आहे. सरपंचपदासह संपूर्ण पॅनलसाठी लागलेल्या लिलावात २ कोटी ५ लाखांत सरपंचपदाची अखेरची बोली लागली.

अनेक ग्रामपंचायतींमध्ये सरपंचपदासाठी लिलाव लावला जात आहे. नंदुरबार खोडामळी गावच्या सरपंच पदाच्या लिलावाची घटना ताजी असताना नाशिक जिल्ह्यातला उमराणेचा हा प्रकार समोर आला आहे.

कांदा बाजार समितीमुळे उमराणे गाव नावारूपाला आले आहे. यावर्षी ग्रामपंचायत निवडणूक बिनविरोध करण्याचे ठरवण्यात आले होते.

१ कोटी ११ लाखांपासून सुरु झालेल्या लिलाव हा २ कोटी ५ लाखावर पोहोचला. माजी जिल्हा परिषद सदस्य प्रशांत देवरे यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचे सुनील दत्तू देवरे यांनी हा लिलाव जिंकल्याचे व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे. लिलावाचा हा पैसा रामेश्वर महाराज यांच्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी वापरला जाणार असल्याची प्राथमिक माहिती आहे.