दोन वर्षीय चिमुकल्याचा इमारतीवरून पडून मृत्यू

दोन वर्षीय चिमुकल्याचा इमारतीवरून पडून मृत्यू
देशदूत न्यूज अपडेट

नाशिक | प्रतिनिधी Nashik

दोन वर्षाच्या चिमुकल्याचा इमारतीवरून पडून मृत्यू झाल्याची दुःखदायक घटना येथील के जे मेहता हायस्कूल परिसरात घडली या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे....

येथील के जे मेहता हायस्कुल जवळ असलेल्या लोटस अपार्टमेंट गार्डन इस्टेट मध्ये राहणाऱ्या उवेंन प्रतीक मोकशी हा 23 महिन्याचा चिमुकला तिसऱ्या मजल्यावर असलेल्या घरात खेळत होता खेळता खेळता अचानक पणे तो इमारतीवरून खाली पडल्याने डोक्याला गंभीर जखम झाली.

त्यानंतर त्याला उपचारासाठी तातडीने बिटको हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले. परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेप्रकरणी उपनगर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com