लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू व विभव शिंदे यांनी जिंकली 'अल्ट्रा स्पाईस रेस'

लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू व विभव शिंदे यांनी जिंकली 'अल्ट्रा स्पाईस रेस'

नाशिक | प्रतिनिधी

इन्स्पायर इंडिया आयोजित अतिशय खडतर व आव्हानात्मक अल्ट्रा स्पाईस रेस ही गोवा - कूर्ग- गोवा 1200 की. मी. ची स्पर्धा नाशिकचे सायकलिस्ट लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू व विभव शिंदे यांनी जिंकली...

लेफ्टनन कर्नल भरत पन्नू, विभव शिंदे व डॉ. हिमांशु ठुसे यांनी 1200 किलोमीटर अन सपोर्टेड अल्ट्रा स्पाईस रेसमध्ये सहभाग नोंदवला होता. ही स्पर्धा पूर्ण करण्यासाठी 84 तास दिले जातात, यामध्ये खाणे-पिणे व सायकलला आलेले प्रॉब्लेम हे सर्व स्वतः मॅनेज करावे लागते.

लेफ्टनंट कर्नल भरत पन्नू यांनी 76 तास 4 मिनिट मधे पुर्ण केली. या स्पर्धेत सतत पाच वर्षांपासून ते विजयी ठरत आले आहेत.

विभव शिंदे यास गेल्या चार वर्षापासून सायकलिंगची गोडी निर्माण झाली. लॉकडाऊनच्या काळात होम ट्रेनरवर चांगल्या प्रकारे प्रॅक्टिस केली व प्रथमच अल्ट्रा स्पाईस या स्पर्धेचे आव्हान स्वीकारले.

अतिशय खडतर अशी ही स्पर्धा 76 तास 43 मिनिट मध्ये पूर्ण करून दुसरा क्रमांक त्यांनी पटकावला.

डॉ. हिमांशु ठुसे हे देखील चांगल्या रीतीने लीड करत होते. दुसऱ्या कंट्रोल पॉइंट पास नंतर त्यांच्या गुडघेदुखीचा वेदनेमुळे वेग कमी झाला. सायकलमध्ये देखील बिघाड झाला होता. या सर्व गोष्टींवर मात करून ही स्पर्धा पूर्ण करण्यात त्यांनी यश मिळवले.

नाशिक सायकलिस्ट फाऊंडेशनचे अध्यक्ष राजेंद्र वानखेडे, कार्यकारिणी टीम व सर्व सायकलिंस्टनी या स्पर्धेचा अनुभव लाईव्ह ट्रॅक द्वारे अनुभवला व सायकल वीरांचे अभिनंदन केले.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com