संशयिताने न्यायालयातच मागितली खंडणी; दाेघांना अटक

खंडणी
खंडणी

नाशिक | प्रतिनिधी

खुनाच्या गुन्ह्यात सहआरोपी असलेल्या संशयिताकडे एका सराईत गुन्हेगाराने न्यायालयातच खंडणीची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे...

याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात जयेश हिरामण दिवे (३८, रा. पेठफाटा) याच्यासह अरुण गायकवाड (४०, रा. कोळीवाडा, हिरावाडी) या दोघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पवन शिवाजी कातकाडे (३३, रा. इंदिरानगर) याच्या फिर्यादीनुसार सरकारवाडा पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खुनाच्या गुन्ह्यासंदर्भात अतिरीक्त सत्र न्यायालयात संशयितांची तारीख होती.

खुनाच्या गुन्ह्यात कातकाडे, दिवे हे सहआरोपी आहेत. बुधवारी (दि.१७) दुपारच्या सुमारास न्यायालयात सुनावणीसाठी संशयित आले होते. त्यावेळी पवन हा रोहित उघडेसोबत बसलेला असताना संशयित दिवे व गायकवाड यांनी कातकाडेस जीवे मारण्याची धमकी देत ५० हजार रुपयांची खंडणी मागितली.

यामुळे पवनने सरकारवाडा पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन दोघा संशयितांना अटक केली. न्यायालयाने दोघांनाही एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

संशयित जयेश दिवे याच्याविराेधात तीन खून, मारहाण, जबरी चोरी, दरोडा, जीवे मारण्याचा प्रयत्न असे एकूण दहा गुन्हे दाखल आहेत. तर अरुण गायकवाडविरोधात मारहाणीचा गुन्हा दाखल आहे. दिवे हा सराईत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com