वाहन परवान्यासाठी आता 'हे' प्रमाणपत्र बंधनकारक

वाहन परवान्यासाठी आता 'हे' प्रमाणपत्र बंधनकारक
USER

नाशिक | प्रतिनिधी

पक्के वाहन परवान्यासाठी सुरक्षित वाहन चालकांसंबंधित कायद्यात नवीन झालेले बदल आणि ड्रायव्हिंग नियामक 2017 या अनुषंगाने नाशिक फर्स्ट या सेवाभावी संस्थेद्वारे घेण्यात येणारे प्रशिक्षण प्रमाणपत्र बंधनकारक असल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी विनय अहिरे यांनी सांगितले.

नाशिक फर्स्ट या सेवाभावी संस्थेद्वारे यापूर्वी विनामूल्य घेण्यात येणारे प्रबोधनपर प्रशिक्षण आता कोरोना विषाणू संसर्गाच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने ऑनलाइन घेण्यात येणार आहे. या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात सुरू होणारे प्रशिक्षण वर्ग दर आठवड्याच्या मंगळवार, गुरुवार आणि शनिवार या दिवशी सकाळी 11 ते दुपारी 1 वाजेच्या दरम्यान असणार आहे.

या प्रशिक्षणासाठी शिकावू परवानाप्राप्त उमेदवारांनी नाशिक फर्स्ट या संस्थेच्या दूरध्वनी क्रमांक ०२५३-२३१५९६६ अथवा ई मेल आयडी secretary@nashikfirst.co किंवा संकेतस्थळ https://www.nashikfirst.com यावर नोंदणी करावी.

नोंदणी करताना अर्जदाराने त्याचे नाव, ई मेल आयडी, व्हाट्सअप्प मोबाईल क्रमांक, शिकावू परवाना क्रमांक आणि त्याचा वाहन संवर्ग आदी माहिती देणे बंधनकारक असेल.

ऑनलाइन प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना नाशिक फर्स्ट संस्थेद्वारे ई मेल आयडीवर आणि व्हाट्सअप्प क्रमांकावर प्रशिक्षण पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र दिले जाईल.

सदर प्रमाणपत्र पक्के अनुज्ञप्तीसाठी चाचणी देताना चाचणी अधिकारी यांना सादर करणे बंधनकारक असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com