नवीन नाशकात त्रिकुटाची दहशत; पोलीस दुर्लक्ष करत असल्याने नागरीक संतप्त
देशदूत न्यूज अपडेट

नवीन नाशकात त्रिकुटाची दहशत; पोलीस दुर्लक्ष करत असल्याने नागरीक संतप्त

नाशिक | प्रतिनिधी Nashik

काहीही कारण नसताना एकाचा मोबाईल हिसकावून त्याच्या डोक्यात बिअरची बाटली फोडणे, गाडीचा कट मारतो का? अशी कुरापत काढून युवकावर चाकूने वार करणे अशी तीघांची खुलेआम गुंडगिरी नवीन नाशिक (New Nashik) परिसरात सुरू असून पोलीस (Nashik city Police) मात्र याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप संतप्त नागरीकांनी केले आहेत...

पवन वायाळ व त्याचे दोन मित्र (पुर्ण, नाव, पत्ता नाही) असे त्रिकुट मद्यपान करून दुचाकीवरून नवीन नाशिक परिसरात भटकत असते. सावतानगर परिसरातील महालक्ष्मी चौक येथे मंगळवारी रात्री या त्रिकुटाने उल्हास यादवगिरी गोसावी (28, रा. सावतानगर) यास कामावरून घरी येत असताना काहीच कारण नसताना कुरापत काढून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच चाकूने त्याच्या कपाळवार तसेच पाठीवर वार करून जखमी केले. (Crime in Nashik)

तसेच पोलीसांत गेल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. तत्पुर्वी रविवारी (दि.27) दुपारी या त्रिकुटाने मद्यपान करून जात असताना खोडेमळा परिसरात अनिल रामवृक्षसिंग (46, रा. सावतानगर) हे व्यायाम करून बसले असताना त्यांच्याकडे मोबाईलची मागणी केली.

त्यांनी नकार देताच त्यांच्या डोक्यात बिअरची बाटली फोडून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली होती. या दोन्ही घटनांबाबात अंबड पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल आहेत.

मात्र, अंबड पोलीस या त्रिकुटाकडे दुर्लक्षक करत असल्याने पोलीस आपले काही वाकडे करू शकत नाही असे माणुन त्यांची कृत्य सुरू आहेत. यामुळ नागरीक संतप्त झाले असून पोलीसांनी या त्रिकुटावर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com