नाशिक । प्रतिनिधी

करोनाचा प्रभाव, रात्री अकरानंतर लागू असलेली संचारबंदी व रस्तो-रस्ती असलेला पोलीस फौजफाटा परिणामी संपुर्ण शहरात केवळ 4 मद्यपींवर कारवाई होऊ शकली आहे. मागील वर्षी एकुण 333 जणांवर कारवाई झाली होती. त्या तुलनेत यंदा 129 ने घट झली आहे. यातून मद्यपींनी घरी बसने पसंत केल्याचे चित्र समोर येत आहे...

नववर्ष स्वागताला दरवर्षी होणार्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मोठा फौजफाटा शहरात उतरवला होता. रात्री 9 वाजेपासूनच पोलिसांनी ठिकठिकाणी महिला पोलिसांच्या मदतीने टवाळखोरी करणार्यांची धुलाई केली होती. 9 ते 11 वाजेपर्यंत पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे रात्रीच्या सुमारास फारशी वर्दळ रस्त्यावर नव्हती. रात्रीच्या संचारबंदी दरम्यान अवघे दोन मद्यपी पोलिसांच्या हाती लागले.

पोलीस आयुक्त तसेच उपायुक्त यांनी दुपारीच कचड संचारबंदी लागू असणार आल्याचे तसेच रात्री आकरा नंतर कोणी शहरात परतू नये असे आवाहन केले होते. यामुळे संचारबंदी नियमातच 2021 या वर्षाचे स्वागत शहरात झाले. हॉटेल्स सुरू राहण्यावर तसेच मध्यरात्रीपर्यंत चालणार्या पार्ट्यांवर यामुळे बंधने आले. रात्री 11 वाजेपर्यंतच हॉटेल सुरू राहणार असल्याने अनेकांनी मद्य खरेदीकरून घरीच सेवन करणे पसंत केले. शहरातील हॉटेल्सही फुल होती आणि दुसरीकडे पार्सल ऑर्डरचीही मोठी गर्दी होती. पोलिसांनी रात्री पावणे नऊ वाजेच्या

यंदाचे नववर्ष स्वागत नियंत्रीत वेळेत साजरे होण्याची कल्पना असल्याने खाण्यापिण्यासह उत्सवाची सर्व तयारी घरीच करण्यावर नागरिकांनी भर दिला. शहरातील हॉटेल्सही रात्री लवकर बंद झाली. यामुळे रात्रीच्या संचारबंदी दरम्यान मद्यपी व समाजकंटक पोलिसांच्या हाती लागले नाहीत.

पोलिसांच्या माहितीनुसार, हॉटेल लवकर बंद झाली. त्यातच नागरिकांनी घरी राहण्यास पसंती दिली. त्यामुळे बाहेर फारशी वर्दळ नव्हती. मध्यरात्री ग्रामीण भागातून येणार्या वाहनांची कडक तपासणी सुरू होती. दरम्यान, सरकारवाडा आणि नाशिकरोड या दोन पोलिस ठाणे हद्दीत झालेल्या ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या केसेसबरोबर रात्रीच्या संचारबंदी नियमांचे उल्लंघन आणि मद्य प्राशन केल्या प्रकरणी दोघांवर मुंबईनाका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

मद्यपी झाले पसार

दरवर्षी नववर्ष स्वागत पार्ट्या पहाटेपर्यंत सुरू असतात. त्यामुळे पोलिसांकडून मोठ्या संख्येने कारवाई होते. वर्षभरात होणार्या ड्रंक अॅण्ड ड्राइव्हच्या किमान 30 टक्के गुन्हे याच दिवशीचे असतात. यंदा मात्र हा आकडा अवघा दोन इतकाच आहे. रस्तो रस्ती पोलीस असल्याने अनेकांनी घरीच मद्य सेवन करणे पसंत केले.

तर बहूतांश मद्यपी इतर मार्गांनी पसार झाले. पोलीसांनी टवाळखोरी केल्या प्रकरणी पंचवटी आणि नाशिकरोड पोलिस ठाण्यात प्रत्येकी एक तर, शस्त्र बाळगल्याप्रकरणी गंगापूर पोलिस ठाणे हद्दीत एक गुन्हा दाखल करण्यात आला.

मागील वर्षी अशी होती कारवाई

मागील वर्षी 133 जणांवर कारवाई करण्यात आली होती. रात्रीत 1536 वाहनांची तपासणी करण्यात आली होती. पैंकी 141 वाहनांवर 29 हजार 800 रुपयांंचा दंड वसूल करण्यात आला होता. तर 187 तळीरामांवर ड्रंक आणि ड्राईव्हच्या केस दाखल करण्यात आल्या होत्या. तसेच 120 केसेस नशा करून शांततेचा भंग केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते.

तर 3 दारूबंदी कायद्याचे उल्लंघन, 1 तंबाखुयुक्त पदार्थांचे सार्वजनिक ठिकाणी सेवन याच्याही केसेस दाखल करण्यात आल्या होत्या, याच कारवाईत 33 रेकॉर्डवरील गुन्हेगारांची तपासणी करण्यात आली. तसेच शहरातील 61 लॉजिंगची तपासणीदेखील करण्यात आली होती.