आनंदवल्ली खून : मोक्का तपासासाठी न्यायालयाची परवानगी

१० संशयितांना सहा दिवसांची पोलीस कोठडी
आनंदवल्ली खून : मोक्का तपासासाठी न्यायालयाची परवानगी

नाशिक | प्रतिनिधी

भूमाफियांनी केलेल्या आनंंदवलीतील रमेश मंडलिक खून प्रकरणात या टोळीविरोधात शहर पोलीसांनी दाखल केलेल्या महाराष्ट्र संघटीत कायद्यानुसार (मोक्का) विशेष न्यायालयाने मान्यता दिली असून मोक्का तपासास पुढील 45 दिवसांचा कालावधी देत अटक असलेल्या 11 संशयितांपैकी दहा जणांना 24 मेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे...

आनंदवली येथे शेती असलेले वयोवृद्ध शेतकरी मंडलिक यांची फेब्रुवारी महिन्यात हत्या झाली होती. वरवर हा वाद किरकोळ स्वरूपाचा असल्याचे भासवण्यात आले.

प्रत्यक्षात मंडलिक यांची हत्या हा मोठ्या नियोजनाचा भाग असल्याचे पोलिस तपासात निष्पण झाले. त्यानुसार पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी या महिन्याच्या सुरूवातीलाच सदर टोळीविरोधात महाराष्ट्र संघटीत कायद्यानुसार कारवाई करण्याच्या प्रस्तावा मंजुरी दिली.

आता हे प्रकरण विशेष जिल्हा न्यायालयाचे न्यायाधिश वर्धन पी. देसाई यांच्या समोर सुनावणीसाठी आले. मंगळवारी यावर युक्तीवाद झाला, सकाळपासूनच बचाव आणि सरकारी पक्षामध्ये जोरदार युक्तीवाद सुरू होता यामध्ये सरकारी पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अ‍ॅड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी बाजु मांडली.

सरकारी पक्षाच्या युक्तीवादानंतर न्यायालयाने मोक्का तपासासाठी 45 दिवसांची मुदत वाढवून दिली आहे. यावेळी तपासाधिकारी व सहायक पोलिस आयुक्त समीर शेख हजर होते. या गुन्ह्यात पोलिसांनी 11 जणांना अटक केली असून, त्यातील एकाने मोक्का लागण्यापूर्वी जिल्हा न्यायालयातून जामीन मिळवला आहे. उर्वरीत संशयितांना विशेष न्यायालयाने 24 पर्यंत पोलिस कोठडी सुनावली.

भुमाफिय टोळीवर मोक्कातंर्गत कारवाई करता येऊ शकते असे सरकार पक्षाने न्यायालयाच्या निदर्शनास आणुन दिले. त्यामुळे न्यायालयाने यास मान्यता देत सदर तपासासाठी मुदत दिलेली आहे. अटक आरोपींना पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, आता पोलिसांच्या तपासास सुरूवात झाली असल्याचे विशेष सरकारी वकिल अ‍ॅड. डॉ. सुधीर कोतवाल यांनी सांगीतले.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com