'त्या' बंटी आणि बबलीनेच पळवले मंदिरातले दागिने; पोलिसांचे तपास कौशल्य एकदा वाचाच

'त्या' बंटी आणि बबलीनेच पळवले मंदिरातले दागिने; पोलिसांचे तपास कौशल्य एकदा वाचाच
breaking news

नाशिकरोड | प्रतिनिधी Nsahik

जेलरोड (Jailroad) परिसरातील मंदिरातील दागिने व घरफोडी करणाऱ्या बंटी बबलीला नाशिकरोड गुन्हे शोध पथकाने (Nashikroad Local crime branch) मोठ्या शिताफीने अटक केली असून त्यांच्याकडून सोन्या-चांदीच्या ऐवज जप्त करण्यात आलेला आहे...

चोरी करणारे बंटी-बबली (bunty and babli) रिक्षामध्ये फिरत असल्याची माहिती नाशिकरोड पोलिस ठाण्याचे (Nashikroad Police Station) वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांना समजताच त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगून साध्या गणवेशात सापळा रचला परंतु ते मिळून आले नाही. मात्र, सदरची रिक्षा ही त्र्यंबकेश्वर (Trimbakeshwar) परिसरामध्ये असल्याची गुप्त माहिती मिळाली. त्यानंतर गुन्हे शोध पथकाचे कर्मचाऱ्यांनी त्रंबकेश्वर गाठले व परिसरातील विविध ठिकाणी जाऊन ४८ रिक्षाचालकांची चौकशी केली.

त्यानंतर संशयित रिक्षाचालकाचे नाव मनोज जोशी व पत्नी लक्ष्मी जोशी असल्याचे समजल्यानंतर पोलिसांनी सतत तीन दिवस त्र्यंबकेश्वर परिसरात ठिय्या मांडला. जोशी याचा शोध घेतला असता तो टेलिफोन एक्सचेंज जवळ असल्याची माहिती मिळाली त्यानंतर तो त्याची पत्नी लक्ष्मी नाशिक येथे गेले असल्याची माहिती मिळाली.

त्या दोघांचाही फोटो प्राप्त झाल्यानंतर पोलिसांनी नाशिक गाठले. दोघांनाही रिक्षा सहताब्यात घेतले. त्यांनी नाशिक रोड परिसरातील काही घरांमध्ये व मंदिरांमध्ये घरफोडी केल्याची कबुली दिली. दोघेही पती-पत्नी रिक्षा मध्ये येऊन घरफोडी करत असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्या दोघांकडून दोन लाख ३४ हजार तीनशे रुपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला असून त्यामध्ये सोन्या-चांदीचे दागिने मोबाईल फोन चांदीचा मुकुट व रिक्षा जप्त करण्यात आली.

पोलीस आयुक्त दीपक पांडे (Nashik Police Commissioner Deepak pandey) उपायुक्त विजय खरात (DCP Vijay Kharat) सहाय्यक पोलीस आयुक्त समीर शेख (ACP Sameer Shaikh) यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल शिंदे (Senior PI Ganesh Nyayde) पोलीस निरीक्षक गणेश न्यायदे गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश पाटील (PI Yogesh Patil) पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे (PSI Jayesh Gangurde) हवालदार राजेश साबळे विशाल पाटील विशाल पाटील अविनाश अविनाश झुंजरे विशाल कुवर महेंद्र जाधव योगेश योगेश वाजे समाधान वाजे यांनी ही कामगिरी केली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com