'तौत्के'चा फटका : सिन्नरच्या पूर्व भागात आंब्यांचे नुकसान; हातातोंडाशी आलेला घास हिरावला

'तौत्के'चा फटका : सिन्नरच्या पूर्व भागात आंब्यांचे नुकसान; हातातोंडाशी आलेला घास हिरावला

उजणी | वार्ताहर

तौत्के चक्रीवादळाचा तडाखा नाशिकमध्ये बसण्यास सुरुवात झाली आहे. कालपासून वाढलेल्या वाऱ्याच्या वेगाने अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. तर तिकडे सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागामध्ये आंब्याची झाडे कोसळले, अनेक आंब्यांच्या कैऱ्या झोडपल्या गेल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे...

आज पहाटेच्या सुमारास सिन्नरच्या पुर्व भागातील उजणी येथील विमल सुरसे यांच्या शेतातील बहरलेले आंब्याचे झाड कोसळले. यामुळे झाड्याच्या जवळ असलेल्या हौदात कैऱ्या पडल्या आहेत तर वादळामुळे शेकडो कैऱ्यांचे नुकसान झाले आहे.

परिसरात अनेक घरांवरचे पत्रे उडाले आहेत. तर काही शेतकऱ्यांच्या कांद्याच्या चाळींचेदेखील मोठे नुकसान झाले आहे. वादळामुळे हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे बळीराजा पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com