'तौक्ते'चा सुरगाण्यात फटका; पळसण आरोग्य केंद्राचे छप्पर उडाले

'तौक्ते'चा सुरगाण्यात फटका; पळसण आरोग्य केंद्राचे छप्पर उडाले

पळसण| वार्ताहर

तौक्ते चक्रीवादळाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे. सुरगाणा तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास वादळाने रौद्ररूप धारण करत आरोग्य केंद्राचे नुकसान केले. तर परिसरातील उतरत्या छपराचे अनेक घरांची पत्रे आजच्या वादळाने उडवले...

तालुक्यातील पळसन अलंगून, हातरुंडी, मणी, वांगण परिसरात अनेक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या घरांची, जनावरांच्या शेडचे नुकसान आजच्या वादळाने केले.

पळसन येथील उप आरोग्य केंद्र पूर्णपणे उध्वस्थ झाले आहे. नुकसानग्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर अर्थसाहाय्य मिळावे अशी मागणी याठिकाणी नागरिक करत आहेत.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com