गंगापूर धरणात रोइंग सह होणार विविध क्रीडा स्पर्धा

क्रीडामंत्री सुनील केदार; उच्चस्तरीय बैठक घेणार असल्याचे सुतोवाच
गंगापूर धरणात रोइंग सह होणार विविध क्रीडा स्पर्धा

सातपूर | प्रतिनिधी

नाशिकच्या जल क्रीडा व पर्यटनाला उभारी देणारा हा प्रकल्प असून, सुरेख मांडणीतून तो साकारलेला आहे. येणाऱ्या काळात नाशिक मध्ये रोइंग सह विविध वॉटर स्पोर्ट्स सुरू करण्यासाठी उच्चस्तरीय बैठक घेऊन गती देणार असल्याचे मत राज्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी गंगापूर धरणावर भेटीप्रसंगी व्यक्त केले....

गंगापूर धरणात रोइंग सह होणार विविध क्रीडा स्पर्धा
भारतातील नवीन लस Zydus Cadila , इंजेक्शनची गरज नसणार, मुलांसाठी चालणार का?

गंगापूर धरणालगत उभारण्यात आलेल्या वॉटर स्पोर्ट्स प्रकल्पाला ना.सुनील केदार यांनी भेट दिली तसा येथील विविध उपक्रमांची सविस्तर माहिती घेतली. मागील वर्षी डिसेंबरमध्ये प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला होता.

तेव्हापासून आतापर्यंत सुमारे 50 हजार पर्यटकांनी या प्रकल्पाला भेट दिली. करोनामुळे वॉटर स्पोर्ट्स बंद करण्यात आलेले आहे. या प्रकल्पाला भेट देण्यासाठी मुंबई, गुजरात, सापुतारा, पुणे या भागातून मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात.

गेल्या काही वर्षात राज्य सरकारने पर्यटनाला प्रोत्साहन दिले जात आहे. जलसंधारण विभागाची जागा व पाणी या आधारावर या क्रीडा होत असल्याने पवई तलाव, तारकर्ली, गणपतीपुळे, व नाशिक या ठिकाणी हे प्रकल्प सुरू करण्यात आलेले आहेत.

येणाऱ्या काळात भंडारदारा कोयना विदर्भातील विविध स्थानावर असेच प्रकल्प सुरू करण्याचा मानस असून, यासाठी उच्चस्तरीय बैठक घेऊन निर्णय घेतला जाणार असल्याचे क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी सांगितले.

नाशिक प्रकल्पाची कौतुक करताना ना केदार यांनी पायाभूत सुविधांचे सुरेख मांडणी केल्याबद्दल कौतुक केले. त्यासोबतच स्थानिक आदिवासी बांधवांना रोजगार दिल्याने समाधान व्यक्त केले. पर्यटनासाठी सुरेश प्रकल्प राबविण्याची ही त्यांनी नमूद केले. असाच प्रकल्प नागपूरमध्ये उभारण्याचा मानस त्यांनी यावेळी व्यक्त केला.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com