नाशिक | हर्षाली गायकवाड

नुकतेच शहरातील महाविद्यालये सुरु झाले आहेत. विद्यार्थी नव्या स्फूर्तीने पुन्हा एकदा कॉलेजमध्ये येऊ लागले आहेत. मित्र-मैत्रिणींसोबत काही यंस्टर्सनी कॉलेजच्या कॅम्पसची हवा पहिल्यांदाच अनुभवली...

शहरातील कॉलेजमध्ये तरुणाईने कॅम्पसचे कट्टे बहरलेले होते. या कट्ट्यांवर बऱ्याच महिन्यांनंतर पुन्हा गप्पांच्या मैफली रंगल्या. अकरावीची प्रवेशप्रक्रिया पार पडल्यानंतर ज्युनिअर्सनी पहिल्यांदा कॉलेजमध्ये हजेरी लावली.

पहिल्याच दिवशी अनेकांनी नवीन ग्रुप तयार करत कॉलेज कट्ट्यावर कॉलेज लाइफचा आनंद लुटला. नवीन कॉलेज कट्टा, मित्र तयार होणार या कल्पनेने प्रत्येक अनेक जण भारावून गेलेले यावेळी दिसून आले.

कॉलेजच्या पहिल्या दिवशी कट्ट्यावर आणि नव्या ग्रुप्स सोबत अनेकांनी सेल्फी काढत एन्जॉय केला. प्रत्येकाशी नव्याने ओळख करवून घेताना नवे यंगस्टर्स कमालीचे उत्साही जाणवले.

अशा धूमशान कॉलेज लाइफचा श्रीगणेशा झाल्यामुळे कट्टे सध्या बहरू लागले आहेत. कॉलेजला विद्यार्थ्यांची हजेरी कमालीची आहे. त्यामुळे करोनाअधिकच्या कॉलेजमध्ये असलेले उत्साहाचे वातावरण सध्या दिसण्यास सुरुवात झाली आहे.

कॉलेज सुरु झाल्याचा त्यांच्या मुखावरील आनंद, नवीन मित्र-मैत्रिणींना भेटण्यासाठी उत्सुकता त्यांचा मुखवर सहज दिसून येत होती.

दोन तीन वर्षांपासून कॉलेज लाइफची मज्जा अनुभवणारे सीनिअर्सचे ग्रुप आज पुन्हा कल्ला करताना दिसून आले.

काही सीनिअर्सनी कॉलेज सुरू झाल्याबरोबर ज्युनिअरसोबत ओळख करून घेतली आहे. आता लवकरच सीनिअर ज्युनिअर्सला फ्रेशर्स पार्टी देणार आहेत, त्याचं प्लॅनिंग करायलाही अनेकांनी सुरुवात केली आहे. या प्लॅनिंगसोबत या वर्षात कॉलेजमध्ये कोणत्या ऍक्टिव्हिटीज करायच्या यांच्या प्लॅनिंगचाही फड आज सीनिअर्समध्ये रंगला होता.

एच. पी. टी. कॉलेजची विद्यार्थिनी गायत्री पोरजे म्हणाली की, आता शाळेचे जीवन संपलेय. जास्त धाक कोणाचा नसणार आहे. खूप दिवसांपासून कॉलेजच्या एंट्रीसाठी आम्ही सर्व आतुर झालो होतो, कोविडमुळे ते उशीराका होईना सुरु झाले. नव्याने झालेल्या फ्रेंड्ससोबत आमचा ग्रुप तयार झाला असून, ग्रुप सेल्फी घेत कॉलेज चा पहिला दिवस आम्ही एन्जॉय केला.

महाविद्यालय ही ती जागा आहे, जिथे विद्यार्थ्यांना सर्वांगीण दृष्ट्या विकास होत असतो. त्यामध्ये कॉलेजचा परिसर ही आलाच. खरं तर ऑनलाईन वर्ग सुरु झाले त्या वेळीच अभ्यासाला सुरुवात झाली होती. पण प्रत्यक्ष शिकण्यात जी मज्जा आहे ती ऑनलाईनमध्ये नाही. त्यामुळे कोविड नंतर पुन्हा एकदा महाविद्यालये सुरु झाल्याने नवचैतन्य निर्माण झाले आहे.
शुभम धांडे, विद्यार्थी

कॉलेजमध्ये परत खूप महिन्यांनी येण्याचा आनंद काही औरच आहे. टाळेबंदीमुळे कॉलेज मधल्या धमाल मस्तीला खूप मिस करत होते. परंतु, मनात भीती असली तरीदेखील कोविड आता नाहीसा होत आहे. त्यामुळे काळजी घेत आणि सतर्क राहून कॉलेजची लाईफ पुन्हा जगण्याचा प्रयत्न करत आहे.
भाग्यश्री तोरणे, विद्यार्थिनी