स्टेट बँक चौक खून प्रकरण : संशयितांना पोलीस कोठडी

स्टेट बँक चौक खून प्रकरण : संशयितांना पोलीस कोठडी

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

स्टेट बँक चौकाजवळ (State Bank Chauk) असलेल्या हॉटेल सोनाली (Hotel Sonali) समोर बुधवारी रात्री प्रसाद भालेराव (Prasad Bhalerao Murder) या तरुणाचा खून झाला होता. याप्रकरणी चौघा संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून बुधवार (दि.4) पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.... (Crime news from nashik)

स्टेट बँक चौपाटी येथील हॉटेल सोनाली समोर बुधवारी(दि.28) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास देवळाली गाव येथील प्रसाद भालेराव हा त्याचा काही मित्रांसमावेत जेवण करण्यासाठी आला होता.

किरकोळ कारणावरून झालेल्या भांडणात फरशीचा तुकडा डोक्यात टाकत त्याचा खून करण्यात आला होता. यानंतर अंबड पोलिसांनी (Ambad Police) सी सी टी व्ही च्या आधारे यातील संशयित अनिल पिठेकर, राहुल पिठेकर, अतुल पिठेकर व संदीप गायकवाड यासह दोन विधिसंघर्षित बालकांना अवघ्या काही तासातच अटक केली होती.

याप्रकरणी, अटकेत असलेल्या चौघांनाही आज ( दि. ३० ) न्यायालयात हजर केले असता त्यांना चार ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी (Police Custody) देण्यात आली असून दोघा विधिसंघर्षित बालकांना बाल न्यायालयात उभे केले असता त्यांची रवानगी बालसुधारगृहात करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास वपोनी कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर करीत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com