वॉटरग्रेसच्या थकबाकी वसुलीसाठी स्थायी आग्रही

तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे सभापतींचे आदेश
वॉटरग्रेसच्या थकबाकी वसुलीसाठी स्थायी आग्रही

नाशिक | प्रतिनिधी Nashik

पाच ते सहा वर्षांपासून जैविक कचऱ्याचे संकलन व विल्हेवाटीच्या रॉयल्टीपोटी थकीत असलेल्या 'वॉटरग्रेस' (Watergress) या कंपनीकडील सुमारे एक कोटींच्या थकबाकी वसुलीसाठी स्थायी समिती (Standing Comity) आग्रही होती. या थकबाकीसंदर्भात तीन दिवसात स्वयंस्पष्ट अहवाल सादर करण्याचे आदेश सभापती गणेश गिते (Ganesh Gite) यांनी आरोग्य-वैद्यकीय विभागाला देताना तोपर्यंत या मक्तेदाराच्या कोविड काळातील ४६.६६ लाखांच्या देयकाचा प्रस्ताव स्थायी समितीद्वारे रोखण्यात येत असल्याचे स्पष्ट केले...

२०१५ मधील वॉटरग्रेसच्या थकबाकीचा वाद गेल्या महिनाभरापासून स्थायी समितीत गाजत आहे. सभापती गिते यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी पार पडलेल्या सभेत यासंदर्भात तिसऱ्यांदा चर्चा होऊन संबंधित मक्तेदाराचा प्रस्ताव पून्हा एकदा तहकूब करण्यात आला.

शिवसेनेचे (Shivsena) महानगरप्रमुख तथा स्थायी समिती सदस्य सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांनी यासंदर्भात हरकत घेत वॉटरग्रेसकडील थकबाकी वसुलीबाबत वैद्यकीय विभागाकडून सादर केल्या जाणाऱ्या अहवालाची विचारणा केल्यानंतर सभापती गिते यांनी सदर प्रस्ताव तिसऱ्यांदा तहकूब करत तीन दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

थकबाकी प्रकरणात तथ्य आढळल्यास संबंधित मक्तेदाराकडून व्याजासहीत थकबाकी वसुल करण्याची भूमिका स्थायी समितीने घेतली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आता काय अहवाल सादर केला जातो याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मानधनावरील ११०८ वैद्यकीय कर्मचाऱ्यांना मुदतवाढ

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची (NMC) रुग्णालये तसेच कोविड सेंटरकरीता (Covid Center) मानधनावर भरती केलेल्या ११०८ वैद्यकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांना ३१ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्याचा व त्यासाठीच्या आठ कोटींच्या खर्चास मंजुरी देण्याचा निर्णय स्थायी समितीने शुक्रवारी घेतला. कोरोनासाठी मानधन तत्वावर भरलेल्या या वैद्यकीय कर्मचाऱ्यांची मुदत संपुष्टात येत असल्याने त्यांची दोन दिवसांची सेवा खंडीत दर्शवून ही मुदतवाढ दिली जाणार आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com