एसटीच्या साडेसहाशे कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कुऱ्हाड

एसटीच्या साडेसहाशे कर्मचाऱ्यांवर सेवा समाप्तीची कुऱ्हाड
बस सेवा

नाशिक | प्रतिनिधी Nashik

गेल्या 24 दिवसापासुन सुरु असलेल्या एसटीच्या संपाची कोंडी फोडण्याचा प्रयत्न शासन स्तरावरुन आहे. आतापर्यंत तीन हजार 3 कर्मच़ार्‍यांवर निलंंबनाची तर 645 जणावर सेवा समाप्तीची कुर्‍हड कोसळली आहे....

आज सकाळच्या बैठकीला जाणार्‍या कर्मचारी प्रतिनिधी यांंना विलणीकरणा शिवाय कुठल्याही भुलथापांना बळी न पडता फक्त विलणीकरणा बाबतच चर्चा करावी व हे जमत नसेल तर नेतृत्व सोडून आपले घर संभाळावे. दुखवटा चळवळ अशीच चालु राहिल. असे संतप्त कर्मचारी सांगत होते. विलीनीकरण होईपर्यंत सर्वच डेपो बंद' अशी घोषणा आज देण्यात येत होती.

एस टी महामंडळाचे राज्य शासनात विलिनीकरण झालेच पाहिजे. घसघशीत पगार वाढ, अंतरिम पगार वाढ हे दोन व्हायरस आहेत. विलीनीकरणाची लस घेऊन येइपर्यंत कुणीही घराच्या बाहेर पडायचे नाही. अशा घोषणा सर्वच डेपो परीसरात दिल्या जात होत्या.

आता येथून पुढे एसटी प्रशासन, परिवहनमंत्री आणि राज्य सरकार फक्त विलीनीकरणाच्या मागणीसंदर्भात चर्चा करणार आहेत. इतर थातूर मातूर मागण्यांसाठी चर्चेस जाऊ नये. चर्चेच्या माध्यमातून संपावर तोडगा काढण्याची घाई ही सरकार आणि प्रशासनाला जास्त आहे. कर्मचार्‍यांना नाही. कर्मचारी अजून 2 महिने संप करण्यासाठी तयार आहोत.

कर्मचारी वर्ग आता महामंडळाच्या चार्जशीट, जाचक परिपत्रके, जुलुमी करार पद्धत, जुलुमी शिस्त आणि आवेदन पद्धती ह्या सर्व गोष्टींला कंटाळलेला आहे.असे कर्मचारी सातत्याने सांगत आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com