नियम धाब्यावर; सिन्नरला खुलेआम मद्यविक्री

नियम धाब्यावर; सिन्नरला खुलेआम मद्यविक्री

सिन्नर । प्रतिनिधी

घरपोहच मद्यविक्रीला परवानगी असतांनाही सिन्नरला खुलेआम मद्यविक्री करुन दोन नामांकित मद्यविक्रेत्यांकडून शासनाच्या निर्बंधाना हरताळ फासला जात असल्याची चर्चा शहरात रंगू लागली आहे...

कोरोनाची साखळी तोडण्यासाठी सरकारकडून लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊन करत असतांना काही अटीशर्ती शासनाकडून घालून दिल्या आहेत. हॉटेल व मद्यविक्रीची दुकानेही बंद ठेवण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या काळात मद्यविक्रीच्या दुकानांसमोर गर्दी होऊ नये म्हणून राज्य उत्पादन शुल्क विभागाने घरपोहच मद्य वितरण सेवेला परवानगी दिली आहे.

कोरोनाचे संक्रमण थोपविण्यासाठी शासनस्तरावरुन कसोसीने प्रयत्न केले जात आहे. लॉकडाऊनच्या काळात ज्या ठिकाणी ही दुकाने सुरु असतात त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होऊन कायदा व सुव्यवस्थेचा एव्हाना आरोग्याचाही प्रश्‍न निर्माण होतो.

त्यामुळे काही निर्बंध लादत मद्यविक्रेत्यांना घरपोच मद्य विक्रीस परवानगी दिली आहे. असे असले तरी सिन्नर शहरातील बर्‍याच हॉटेल व बिअरबार चालकांनी पुढाकार घेत आपले व्यवसाय लॉकडाऊनच्या काळात बंद ठेवलेले आहे.

असे असले तरी शहरातील दोन नामांकित परवानाधारक मद्यविक्रेत्यांकडून शासनाच्या नियमांची पायमल्ली करत चोरी-छुपे, उघड मद्यविक्री केली जात आहे. या दुकानांवर मद्य खरेदीसाठी तळीरामांच्या रांगा बघायला मिळत आहे.

अव्वाच्या-सव्वा दराने दारुची विक्री होत असून ती पदरात पाडून घेण्यासाठी मद्यशौकीनांची दुकानांबाहेर गर्दी असल्याचे चित्र बघायला मिळत आहे. सेवा पुरविणार्‍या व्यक्तींकडून किंवा मद्यविक्रेत्यांकडून कोविड नियमांचे उल्लंघन झाल्यास कडक कारवाईचे आदेशात म्हटले आहे. असे असले तरी दुकानांबाहेरील गर्दी रोखायची कोणी असा प्रश्‍न सिन्नरकर विचारु लागले आहेत.

पोलिसांच्या

करोनाची महामारी रोखण्यासाठी शासनाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहे. काही अटीशर्तींचे पालन करण्यास सांगून घरपोच मद्यविक्री करण्यासाठी परवानगी दिली असतांनाही सिन्नर शहरातील दोन नामांकित मद्यविक्रीच्या दुकानांपुढे गर्दी बघायला मिळते. दुकानाच्या आजूबाजुला घुटमळणार्‍या तळीरामांना बंद दाराआडून दारु मिळत आहे. पोलिस, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या आशीर्वादाशिवाय बिनदिक्कत दारुविक्री होऊ शकत नसल्याची चर्चा शहरात होत आहे. अशाच प्रकारे दारुविक्री सुरु राहिली तर कोरोनाचे संक्रमण कसे रोखू असा सवालही सिन्नरकरांकडून विचारला जात आहे.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com