...म्हणूनच खासदार संजय राऊत नाशकात?

...म्हणूनच खासदार संजय राऊत नाशकात?

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकच्या भाजप कार्यालयावर दगडफेक करणारे नगरसेवक दिपक दातीर (Corporator Deepak Datir) व नगरसेविका किरण दराडे यांचे पती बाळा दराडे (Bala Darade) हे गुन्हे शाखा युनिट १ च्या कार्यालयात आज हजर झाले. कार्यालयावर दगडफेक केल्यानंतर ते फरार झाले होते, यानंतर काल शिवसेनेचे खासदार संजय राऊत जेव्हा माध्यमांना संबोधित करत होते त्यावेळी हे दोघेही खासदार राऊतांच्या पाठीमागे दिसून आले होते....

जेव्हा पत्रकारांशी खासदार राऊत काल (दि २७) मुंबई संवाद साधत होते त्यावेळी भाजप कार्यालयाची तोडफोड करणारे दीपक दातीर आणि बाळा दराडे राऊत यांच्या पाठीमागे उभे असलेले दिसून येत आहेत.
जेव्हा पत्रकारांशी खासदार राऊत काल (दि २७) मुंबई संवाद साधत होते त्यावेळी भाजप कार्यालयाची तोडफोड करणारे दीपक दातीर आणि बाळा दराडे राऊत यांच्या पाठीमागे उभे असलेले दिसून येत आहेत.

काल (दि २७) अचानक उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर खासदार राऊत (MP Sanjay Raut on North Maharashtra Visit) येणार असल्याचे समोर आले होते. यानंतर आज सकाळी नगरसेवक दातीर आणि बाळा दराडे हे पोलिसांना शरण आले. त्यामुळे या शिवसैनिकांना घेऊनच खासदार राऊत नाशकात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

दुसरीकडे दोघेही गुन्हे शाखा युनिट एकच्या कार्यालयात हजर झाल्यानंतर त्यांच्यासोबत यावेळी माजी महापौर विनायक पांडे (Vinayak Pande), माजी आ. वसंत गिते (Vasant Gite), मा. जिल्हाप्रमुख सुनिल बागुल (Sunil Bagul), गटनेते विलास शिंदे (Vilas Shinde), मा.नगरसेवक पुंजराम गामने (Punjaram Gamane) आदिंसह शिवसैनिक उपस्थित आहेत.

तसेच खासदार राऊत (MP Sanjay Raut) यांनी काही वेळेपूर्वीच पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Nashik Police Commissioner Deepak Pandey) यांची भेट घेतल्याची सूत्रांनी माहिती दिली. यामुळे यापुढे पोलीस काय कारवाई करणार याकडे लक्ष लागून आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com