भाजप कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या दोघांना जामीन

भाजप कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या दोघांना जामीन

नाशिक | प्रतिनिधी Nashik

नाशिकमध्ये भाजप कार्यालयावर हल्ला करणाऱ्या शिवसेना कार्यकर्त्यांना न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) झाल्यानंतर १५ हजाराच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. नगरसेवक दीपक दातीर (Deepak Datir), सेना पदाधिकारी बाळा दराडे (Bala Darade) यांच्या सह ३ जणांचा यात समावेश आहे...

भाजप कार्यालयावर (BJP Office) दगडफेक करणार्‍या पाच शिवसैनिकांना जिल्हा व सत्र न्यायालयाने रविवारी (दि.२९) एक दिवसांची पोलीस कोठडी (Police Custody) सुनावली होती. नगरसेवक दिपक दातीर व नगरसेविका किरण दराडे यांचे पती बाळा दराडे यांच्यासह नितीन चंद्रभान सामोरे, योगेश रामकृष्ण चुंबळे, किशोर साळवे यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती.

भाजप कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या दोघांना जामीन
...म्हणूनच खासदार संजय राऊत नाशकात?

भाजप कार्यालयावर दगडफेक करुन मुंबईत फरार झालेले नगरसेवक दीपक दातीर व नगरसेविका किरण दराडे यांचे पती बाळा दराडे यांच्यासह नितीन चंद्रभान सामोरे, योगेश रामकृष्ण चुंबळे किशोर साळवे हे शनिवारी (दि.28) गुन्हे शाखा युनिट एकच्या कार्यालयात हजर झाले होते. गुन्हे शाखेने त्यांना भद्रकाली पोलिसांच्या ताब्यात दिले.

भाजप कार्यालयावर दगडफेक करणाऱ्या दोघांना जामीन
नाशिक महाराष्ट्राचे दिशादर्शक; 'तो' कार्यक्रम करेक्टच : संजय राऊत

भाजप कार्यालयावर दगडफेक केल्यानंतर ते फरार झाले होते. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत हे शनिवारी (दि.२८) प्रसारमाध्यमांना संबोधित करत होते. त्यावेळी हे दोघेही खासदार राऊत यांच्या पाठीमागे दिसून आले.

यानंतर नगरसेवक दातीर आणि बाळा दराडे हे पोलिसांना शरण आले. मध्यवर्ती गुन्हे शाखेने पाच शिवसैनिकांना ताब्यात घेत भद्रकाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असल्याने त्यांच्या ताब्यात दिले. रविवारी भद्रकाली पोलिसांनी त्यांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने पाचजणांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com