नाशिक | प्रतिनिधी

मागील निवडणुकीत आम्ही भाजपा करेक्ट कर्यक्रम करू शकलो असतो. पण आम्ही ते टाळले होते. पुढील निवडणुकीत भाजपचा लोकशाही मार्गाने 'करेक्ट' कार्यक्रम वाजवत महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकवणार असल्याचा दावा शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केला. ते आज नाशिकमध्ये माध्यमांशी बोलत होते...

ते म्हणाले, जळगाव मध्ये सेनेची सत्ता आल्यावर भाजपने त्यास घोडेबाजार म्हटले होते. त्यास प्रत्युत्तर देताना तुम्ही जी तोडफोड करतात त्याला काय गाढवाचा बाजार म्हणायचे का? असा खोचक सवालदेखील त्यांनी उपस्थित केला.

तसेच पुढे बोलताना ते म्हणाले की, पहाटेची शपथ काय होती ते त्यांनी सांगावे. नाशिक महापालिकेची आगामी निवडणूक लक्षात घेता सहा जणांची कोअर टीम तयार केली जाईल.

सत्ताधारी भाजपने नाशिक महापालिकेत लुट चालवली आहे. दररोज दरोडे पडत आहेत. याची माहिती आपल्याकडे असून आम्ही ती जनतेपर्यंत पोहोचवू असे ते म्हणाले.