नाशिक | करणसिंग बावरी

नाशिकमधील छत्रपती सेना यंदाही शिवजयंतीच्या निमित्ताने विश्वविक्रम करणार आहे. यंदा छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य टाक नाशकात बनविण्यात येत आहे. हा टाक ८ फूट उंच व ६ फूट रुंद व अंदाजे वजन ७० किलो वजनाचा आहे.

२०१९ शिवजन्म उत्सव दरम्यान विश्वविक्रमी जिरे टोप साकारण्यात आला होता. याची उंची १४ फूट होती तर घेर ११ फूट होता. या जिरेटोपाची नोंद वंडर बुक ऑफ रेकॉर्ड लंडन येथे याची नोंदणी झाली.

तर 2020 शिवजन्म उत्सव करीता १३५ किलो वजनाची १३ फूट रुंद भव्य भवानी तलवार प्रतिकृती साकार करत या विश्वविक्रमाची वंडर बुक ऑफ रेकॉर्ड लंडन नोंद झाली.

यंदाच्या शिव जन्म उत्सव दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य टाक बनविण्यात येत असून सदर टाक हा नाशिकच्या शुभरूषी ज्वेलर्स यांच्या सौजन्याने तयार केला जात आहे.

हा टाक ८ फूट उंच व ६ फूट रुंद व अंदाजे वजन ७० किलो असणार आहे. टाक घडविण्यासाठी तांबे, पितळ या धातूसह लाख चा वापर केला जातआहे. हा टाक पूर्णत्वास येण्यासाठी किमान 30 दिवसाचा कालावधी लागला आहे.

या टाकचे अनावरण १८ फेब्रुवारी होणार आहे. याच दिवशी वय वर्ष ७ ते १२ वर्ष मधील बालकांचे शिवकालीन मैदानी खेळ व शौर्य प्रदर्शन होणार आहे. यात लाठ्या-काठ्या तलावर, दांडपट्टा, चक्र असे विविध खेळांचे प्रात्यक्षिक सादर केले जाणार आहे.

ही सर्व मुले संगमनेर तालुक्यातील आहेत. तसेच इतिहास कालीन नाण्याचे प्रदर्शन देखील भरविण्यात येणार आहे.

१९ फेब्रुवारी २०२१ रोजी हा टाक नाशिकच्या पारंपरिक मिरवणूकमध्ये चित्र रथ वर असणार आहे. त्याचप्रमाणे मागील वर्षी साकारलेले विश्वविक्रमी भवानी तलवार मराठा विद्या प्रसारक समाजाच्या वस्तू संग्रलायला भेट स्वरूपात दिली जाणार आहे.