Video : बापरे! शाडू मातीचा सर्वात महागडा गणपती झाला बुक

Video : बापरे! शाडू मातीचा सर्वात महागडा गणपती झाला बुक

नाशिक । प्रतिनिधी Nashik

शहरातील महात्मा फुले कलादालन (Mahatma Phule Kaladalan) या ठिकाणी शाडू माती मुर्तीकार संघटना (Shadu Soil Ganesh) आणि नाशिक महानगर पालिका (Nashik Municipal Corporation) यांच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या बाप्पा माझा (Bappa Maza) या ठिकाणी आतापर्यंतच्या सर्वात महागडी शाडू मातीची मूर्ती बुक झाली आहे. शहरातील एका भक्ताने शंभर दोनशे नाही तर तब्बल ३५ हजार रुपये (Thirty five thousand) मोजून ही मूर्ती पूर्व नोंदणी करून राखीव केलेली आहे....

दरम्यान, आधी गायक गणेश या रुपात असलेल्या मंगलमूर्ती मध्ये गणेशाने हातात वीणा धारण केलेली आहे. तर दुसऱ्या हातात प्रसाद आहे. सूर आळवीत असलेल्या या मंगलमूर्तीचा एक बाहू आलाप घेत आहे.

गाण्यात तल्लीन झालेल्या या श्रीच्या मूर्तीची निर्मिती पायापासून ते मुकुटापर्यंत करण्यात आली आहे. साधारण दोन ते तीन दिवस ही मूर्ती साकारण्यासाठी लागले आहेत. त्यासोबतच बाप्पाच्या बसण्याचे आसन ते हातामध्ये असलेले वीणा कोणताही साचा न वापरता बनविलेली आहे.

राज्य शासनाने पीओपी ऐवजी शाडू मातीची मूर्ती वापरण्याबाबत नियमावली आखल्याने आता शाडू मातीच्या मूर्ती बनविण्याला वाव आला आहे. नागरिकांमध्ये शाडू मातीची मूर्ती रेखीव नसते हा असलेला हा गैरसमज दूर होण्यात मदत होईल.

संतोष शहरकर, संतोष आर्ट्स, नाशिक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com