नाशिकच्या 'या' शाळेलाच करणार 'कारागृह'

करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय; बाहेरून आलेल्या कैद्यांना करणार दाखल
नाशिकच्या 'या' शाळेलाच करणार 'कारागृह'

नाशिकरोड | प्रतिनिधी

नाशिकरोड मध्यवर्ती कारागृह प्रशासन पुन्हा येथील एका शाळेत तात्पुरते जेल सुरु करणार आहे. राज्यात व शहरात करोनाची दुसरी लाट आल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे...

नवीन कैद्यांना थेट मुख्य कारागृहात प्रवेश न देता केला शाळेच्या जेलमध्ये ठेवण्यात येईल. कारागृहाच्या सूत्रांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शहर पोलिसांचा बंदोबस्त मिळताच लवकरच हे तातपुरते जेल सुरु करण्यात येणार आहे.

नाशिकरोड कारागृहाने कारागृहाने गेल्या वर्षी लॉकडाउनमध्ये अनेक उपाययोजना केल्यामुळे करोना रोखण्यात कारागृह यशस्वी झाले होते. त्यावेळी कारागृहा शेजारील के. एन. केला इंग्रजी शाळा ताब्यात घेऊन सुमारे वर्ष दहा महिने तात्पुरते जेल सुरु केले होते.

त्यामुळे कारागृहांमध्ये कैदी व कर्मचा-यांना करोना संसर्ग झाला नाही. राज्यभरात या उपाययोजनांचे कौतुक झाले होते. दहा दिवसांसांपूर्वी कोपरगावहून नाशिकरोड कारागृहात दाखल होण्यासाठी वीस कैदी दाखल आले होते.

कारागृहाच्या प्रवेशव्दारावर त्यांची करोना चाचणी केल्यावर दहा कैदी पॉझिटिव्ह आढळल्याने खळबळ उडाली होती. या कैद्यांना कारागृहातील स्वतंत्र कक्षात उपचार करुन बरे करण्यात आले. सध्या करोनाची दुसरी लाट आली आहे.

त्यामुळे प्रशासनाने के. एन. केला शाळेत पुन्हा तात्पुरते जेल सुरु करण्याचा निर्णय घेतला. कारागृहा शेजारील के. एन. केला आणि महापालिकेची साने गुरुजी शाळा गेल्यावेळी कारागृहाने ताब्यात घेऊन तेथे कैदी ठेवले होते.

सध्या के. एन. केला शाळेत पुन्हा तात्पुरते जेल सुरु करण्यात येणार आहे. शाळेनेही सहकार्य केले आहे. या कारागृहासाठी पोलिस आयुक्तालयाकडून पोलिसांचा बंदोबस्त मिळणार आहे. पोलिस 24 तास तेथे बंदोबस्त ठेवतील. नातेवाईकांना कैद्यांना भेटता येणार नाही.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com